Headlines

जेव्हा ‘दि आर्चीज’ च्या दिग्दर्शिकेला वडील जावेद अख्तर यांनी केला विरोध…

[ad_1]

‘अपना टाईम आयेगा’ म्हणत रणवीर आणि आलीयाच्या ‘गल्ली बॉय’ या चित्रपटानं बॉक्स ऑफिस आणि तरुणांची मनं दोन्हीही हाऊसफुल केली होती. दिग्दर्शिका जोया अख्तरच्या या प्रयत्नाने यशाचं शिखर गाठलं  होत.पण या सगळ्या प्रवासात प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांनी आपली लेक जोया अख्तरवर अविश्वास दाखवला होता. 

‘गल्ली बॉय’ 
2018 मध्ये आलेल्या ‘गल्ली बॉय’ या म्युझिकल चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं होत. रणवीर आणि आलियाच्या अभिनयाने तरुणाई भारावून गेली होती. प्रेक्षकांना हा चित्रपट आणि चित्रपटातील संवाद आजही लक्षात आहेत. 

जावेद अख्तर लेकीवर अविश्वास दाखवतात…..
झोपडपट्टीत राहण्याऱ्या अंडरग्राऊंड रॅपर्सची गोष्ट जोया अख्तरने  वेगळ्या पद्धतीने मांडली होती. तिच्या या कामाचं सर्वांनी कौतुक केलं होत पण आपली लेक अश्या प्रकारचा चित्रपट करू शकणार नाही असं जावेद अख्तर यांनी स्वतः सांगितलं होत. 

जावेद अख्तर म्हणतात ‘तुला कुठे हे सगळं माहिती असणार… 

एका मुलाखती दरम्यान जावेद अख्तर म्हणाले होते की , ‘जोया जेव्हा गल्ली  बॉय बनवत होती तेव्हा मला असं वाटत होतं की,हीला कुठे जमणार हे सगळं, बँडस्टँड  मध्ये राहणारी, सुट्टी असल्यावर लंडन – अमेरिकेसारखी  शहरं  फिरणारी हीला कुठे इथलं काही माहित असणार आहे.असं मी मनातल्या मनात विचार करायचो. तिला हे सगळं सांगण्याची हिम्मत माझ्यामध्ये नव्हती. पुढे ते म्हणतात की, पण मी जेव्हा हा चित्रपट पहिला तेव्हा मला वाटलं ही संपूर्ण आयुष्य त्या परिसरात जगली आहे. झोपडपट्टीतील एक एक गोष्ट तिने हुबेहुब दाखवली होती . 

सलग सहा वेळा फिल्मफेअर पुरस्कार जिंकणारी जोया सध्या ‘दि आर्चीज’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे.जोया अख्तर च्या एकाच चित्रपटातून 3 स्टारकिड्स  बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत, ७ डिसेंबरला नेटफ्लिक्स वर प्रदर्शित होणाऱ्या हा चित्रपट त्याच्या कथानकावर,त्यातील कलाकारांमुळे खूप चर्चेत आहे. एका प्रसिद्ध कॉमिकच चित्रपटात रूपांतर तिनं केलं आहे. जोया अक्खतरने दिलेल्या उत्तोमोत्तम चित्रपटात हा चित्रपटसुद्धा भर घालू शकतो. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *