Headlines

घटस्फोटाच्या तीन वर्षानंतर जेव्हा नागा आणि समांथा समोरा-समोर येतात; व्हिडीओ व्हायरल

[ad_1]

Samantha Ruth Prabhu and Naga Chaitanya : अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू आणि तिचा एक्स पती नागा चैतन्यला घटस्फोटाच्या तीन वर्षानंतर समोरा-समोर आले आहेत. समांथा आणि नागा चैतन्य लीडिंग ओटीटी प्लेटफॉर्मच्या एका इव्हेंटमध्ये आप-आपल्या शोसाठी पोहचले होते.

हा इव्हेंट १९ मार्चला पार पडला. समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ने या इव्हेंटला वरुण धवनसोबत हजेरी लावली. जिथे तिने आपली एक्शन सिरीज ‘सिटाडेल: हनी बन्नी’बद्दल सांगितलं आहे. या सिरीजचं दिग्दर्शन  राज एंड डीकेने केलं आहे. तर दुसरीकडे नागा चैतन्य आपली वेबसिरीज ‘धूथा’चं सक्सेस सेलिब्रेट करण्यासाठी पोहचलं होते. नागाची वेब सिरीजदेखील याच  ओटीटी प्लेटफॉर्मवर प्रीमियर झाला होता. 

समांथा आणि नागा चैतन्यचे व्हिडीओ फोटो व्हायरल
या दोघांना एकाच इव्हेंटमध्ये घटस्फोटाच्या तीन वर्षांनंतर स्पॉट केलं गेलं. या दोघांना पाहून चाहते चांगलेच हैराण झाले. इव्हेंटमधून दोघांचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. खरंतर  या कार्यक्रमादरम्यान दोघांचा एकही फोटो किंवा व्हिडिओ समोर आलेला नाही. सामंथा आणि नागाचा व्हिडीओ आणि फोटो स्टेजवरील आहे. जिथे दोघंही आप-आपल्या टीमसोबत उभं असल्याचं दिसत आहेत. 

२०२१ मध्ये वेगळे झाले समांथा आणि नागा चैतन्य
२०२१ साली समांथा रुथ प्रभु आणि नागा चैतन्य विभक्त झाले. दोघांनीही आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून घटस्फोटाची माहिती दिली होती. नागाने लिहीलं होतं की, ”आमच्या सर्व हितचिंतकांसाठी… खूप विचार केल्यानंतर, सॅम आणि मी पती-पत्नी म्हणून वेगळं होण्याचा आणि स्वतःच्या मार्गावर पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही भाग्यशाली आहोत की, आमच्यात एक दशकाहून असलेली जुनी मैत्री आणि आमचं मानणं आहे की,  हेच आमच्यातलं एक खास बॉन्डिंग आहे.”

नागा चैतन्यची पहिली वेब सिरीज ‘धूधा’  
नागाची ही पहिलीच वेबरिज आहे. ‘धूधा’ असं या सिरीजचं नाव आहे . ज्याचा प्रिमीयर १ डिसेंबरला प्राइम वीडियोवर पार पडला. या सिरीजमध्ये नागाने एका जर्नलिस्टची भूमिका निभावली होती. या सिरीजमध्ये त्याच्यासोबत पार्वती तिरुवोथू, प्रिया भवानी शंकर आणि प्राची देसाई महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

समांथा रुथ प्रभुचा ‘सिटाडेल’
समांथा रुथ प्रभु आणि वरुण धवनची ‘सिटाडेल: हनी बन्नी’ ही वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही वेब सीरीज दोन्ही कलाकारांचा ओटीटी डेब्यूदेखील आहे. या सीरीजमध्ये समांथा रुथ प्रभू एक्शन करताना दिसणार आहे.  या सिरीजमध्ये तिच्या व्यतिरीक्त   केके मेमन, सिमर, सोहम मजूमदार, शिवांकित सिंह परिहार, काशवी मजूमदार, साकिब सलीम आणि सिकंदर खेर देखील झळकणार आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *