Headlines

‘सापाचं विष की कोकेन… तुला काय हवं?’ एल्विश यादवचा मित्रांसोबतचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

[ad_1]

Elvish Yadav Snake Venom : गेल्या अनेक दिवसांपासून एल्विश यादव हा रेव्ह पार्टीतील साप आणि सापांच्या विष प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्याची सुटका व्हावी यासाठी त्याचे वकील खूप प्रयत्न करत आहेत. या प्रकरणात कोर्टात सुनावणी सुरु आहे. त्यातील काही अपडेट्स समोर आले आहे. त्याच्या आई-वडिलांवर देखील याचा फार वाईट परिणाम होत आहे. आता एल्विशचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एल्विशनं अशी काही वक्तव्य केली आहेत जे ऐकून सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. त्यात त्यानं अनेक ड्रग्सची नावं घेतली आहे, त्याशिवाय त्यानं स्नेक बाइटचा देखील उल्लेख केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एल्विश सगळ्यांच्या निशाण्यावर आला आहे. 

एल्विशचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून तो ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत एल्विश काही मुलांसोबत बसला असून त्यावेळी “कोकेन, एमडी, स्नेक बाइट, एलएसडी, गांजा, हैश, क्रीम… तुला काय पाहिजे.” एल्विश यादव त्याचं बोलणं पूर्ण करण्याआधीच कोणीतरी त्याच्यात काही म्हणाले. मात्र, ती समोरची व्यक्ती काय म्हणाली “हे काही स्पष्ट ऐकायला येत नाही आहे.” ज्यानंतर एल्विश बोलतो, “मला नाही माहित”.

एल्विशचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांची प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी म्हणाला की “ही तर फक्त सुरुवात आहे. अजून बरंच येणं बाकी आहे.” दुसरा नेटकरी म्हणाला की “हे तर गेले आता, सिस्टम हॅंग.” तिसरा नेटकरी म्हणाला, “हे शॉकिंग आहे. खरंच. फार वाईट.”

सापाच्या विषाची तस्करी करण्याच्या प्रकरणात एल्विशला थोडी स्थिरता मिळाली आहे. गौतमबुद्ध नगर पोलिसांनी त्यांच्या विरोधात NDPS अॅक्टच्या अंतर्गत असलेल्या सगळ्या कलम काढून टाकण्यात आले आहेत. अशा स्थितीत त्यांच्या जामिनाचा मार्गही मोकळा झाला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, एनडीपीएस कायद्याचे कलम 22 त्याच्यावर लावले जाणार होते, परंतु चुकून कलम 20 लावले गेले.

हेही वाचा : अल्लू अर्जुनला खरंच अटक झाली? चाहत्यांची चिंता वाढवणाऱ्या ‘या’ फोटो मागचं सत्य आलं समोर

एल्विशला 17 मार्चला गौतमबुद्ध नगर पोलिसांनी अटक केलं. त्यावेळी त्याला विचारपूस करण्यासाठी बोलावण्यात आलं होतं, मात्र त्याच्याकडून अपेक्षित उत्तर मिळाली नाही त्यामुळे त्याला अटक करण्यात आली. तर कोर्टानं त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. एल्विश सध्या लक्सर तुरुंगात बंद आहे. 19 मार्च रोजी, त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं. दरम्यान, असं म्हटलं जात आहे की वकिलांच्या संपामुळे त्याच्या जामिनावर सुनावणी होऊ शकत नाही. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *