Headlines

हम तुम्हारी दादी हो सकते थें; आराध्यासोबत Rekha यांना पाहताच नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

[ad_1]

Nita Mukesh Ambani Cultural Centre Rekha With Aishwarya and Aaradhya : नीता मुकेश अंबानी कल्टरल सेंटरच्या (Nita Mukesh Ambani Cultural Centre) उद्घाटनासाठी अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यात अनेक हॉलिवूड सेलिब्रिटीज देखील आपल्याला पाहायला मिळाले. बॉलिवूड कलाकारांची तर आपण गर्दी पाहिली. पण सगळ्यांते लक्ष हे बच्चन कुटुंब (Bachchan Family) आणि रेखा (Rekha) यांनी वेधले. अंबानींच्या या कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी रेखा या अमिताभ बच्चन यांच्या जवळची व्यक्ती म्हणजे आराध्यासोबत दिसल्या. त्यांचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. इतकंच काय तर नेटकऱ्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. 

आराध्या, ऐश्वर्या आणि रेखा यांचा हा फोटो सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या फोटोत सगळ्यात आधी तीन फोटोंचं कोलॅब शेअर करण्यात आलं आहे. यात एका फोटोत स्पायडर मॅन फेम जेंडिया (zendaya) आणि टॉम हॉलंड (Tom Holand) यांच्यासोबत नीता अंबानी, शाहरुख आणि सलमान खान पोज देताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोत जेंडिया करिश्मा कपूर आणि नीता अंबानी या दिसत आहेत. तर एका फोटोत डिझायनर मनिष मल्होत्रा, ऐश्वर्या, आराध्या आणि रेखा दिसत आहेत. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. 

या फोटोत सगळ्यांचे लक्ष वेधले ते म्हणजे ऐश्वर्या, आराध्या आणि रेखा यांच्या फोटोनं. या वेळी आराध्याला रेखा यांनी प्रेमाणं जवळ घेतलं आहे. यावरून अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, रेखा आराध्या आणि ऐश्वर्या एकाच फोटोत? दुसरा नेटकरी म्हणाला, रिश्ते में हम तुम्हारी दादी हो सकते थें . तिसरा नेटकरी म्हणाला, रेखा त्यांच्या नातीसोबत. दरम्यान, त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. या फोटोंवर नेटकऱ्यांनी आणखी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 
 

Nita Mukesh Ambani Cultural Centre Rekha With Aishwarya and Aaradhya Got Trolled
(Photo Credit: Viral Bhaiyani)

हेही वाचा : ना घर ना जमीन… परिणीतीसोबत नाव जोडलं जात असताना Raghav Chadha यांची एकूण संपत्ती समोर!

दरम्यान, सोशल मीडियावर फक्त ही एकच चर्चा सुरु नाही. तर अंबानीचं एका ठिकाणी सगळ्या कलाकारांना घेऊन येऊ शकतात. कारण इतर ठिकाणी सगळेच सेलिब्रिटी एकत्र दिसत आहे. अंबानी यांच्या या कार्यक्रमासाठी हॉलिवूडची सुपरमॉडेल गीगी हदीद देखील पोहोचली होती. तिचा कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. इतकंच काय तर त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिचा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *