Headlines

‘रेस्तराँमध्ये बदलले कपडे, बेंचवर झोपून…’; विवेक ओबेरॉयची का झालेली इतकी दयनीय अवस्था

[ad_1]

Vivek Oberoi : बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय हा त्याच्या चित्रपटांसोबतच त्यांच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे. विवेक ओबेरॉय गेल्या काही दिवसांपासून ‘इंडियन पुलिस फोर्स’ या वेब सीरिजमूळे चर्चेत होता. तर आता त्याचे चर्चेत येण्याचे कारण त्याची एक मुलाखत आहे. त्यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या साथिया या चित्रपटाविषयी वक्तव्य केलं आहे. त्यावेळी त्यानं कसं स्ट्रगल केलं आणि त्या संपूर्ण टीमनं चित्रपटाचं बजेट पाहता कसं काम केलं ते सांगितलं. 

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत विवेक ओबेरॉयनं ‘साथिया’ या त्याच्या रोमॅन्टिक चित्रपटाविषयी सांगितलं आहे. त्याशिवाय चित्रपटाचं बजेट कमी असल्यानं रेस्टॉरंटच्या टॉयलेटमध्ये कपडे बदलावे लागत होते आणि बेंचवर झोपावे लागले हे देखील विवेकनं सांगितलं. “सतत चर्चा केल्यानंतर एक गोष्ट समोर आली की प्रत्येक व्यक्ती मला म्हणायचा की ‘साथिया’मध्ये काम करू नको. तू एक अॅक्शन हिरो आहेस. तू एखाद्या लव्ह स्टोरी चित्रपटात भूमिका कशी साकारू शकतोस? माझ्या या निर्णयामुळे माझे गुरु राम गोपाल वर्मा हे देखील रागावले होते. त्यांनी म्हटलं होतं की हा चित्रपट करू नकोस, पण मी विचार केला की त्यांची परवाणगी मागण्यापेक्षा त्यांची माफी मागू. खरंतर, मला हा चित्रपट फार आवडला होता. ‘साथिया’ या चित्रपटाचे दिग्दर्शक शाद अली माझे शाळेतील मित्र आहेत. ते सुरुवातीला अभिषेक बच्चनला घेऊन हा चित्रपट बनवत होते. मात्र, ते शक्य झालं नाही.”

हेही वाचा : विवेक ओबेरॉयनंही केलेला स्वत:ला संपवण्याचा विचार! म्हणाला, ‘सुशांत सिंह राजपुतप्रमाणे…’

त्यानंतर विवेक पुढे 2002 मध्ये चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आलेल्या अडचणींविषयी देखील सांगितलं. “आमच्याकडे बजट नव्हतं. यामुळे त्यावेळी आम्ही रेल्वे स्टेशनवर शूटिंग करत होता, तिथेच असलेल्या बेंचवर मी झोपायचो. माझ्या जवळ मेकअप व्हॅन नव्हती. त्यामुळे मी रेस्टॉरंटच्या शौचायलायत कपडे बदलायचो. आम्हाला एका दिवसात चार सीन शूट करावे लागत होते. आम्ही दिवसात 18-20 तास शूटिंग करायचो. पदार्पणानंतरही तिथल्या लोकांना मदत करण्यासाठी शूटिंगच्या वेळी मला उपकरण उचलावी लागली होती.”

विवेकचा शेवटचा प्रोजेक्ट

विवेक ओबेरॉय हा सगळ्यात शेवटी ‘इंडियन पुलिस फोर्स’ या वेब सीरिजमध्ये दिसला होता. या सीरिजचे दिग्दर्शन रोहित शेट्टीनं केलं होतं. तर या वेब सीरिजमध्ये त्याच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा आणि शिल्पा शेट्टी दिसले. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *