Headlines

VIRAL VIDEO : पापाराझींसमोर पोज देता देता Rekha यांचा गेला तोल

[ad_1]

Rekha Viral Video : बॉलिवूड अभिनेत्री रेखा (Rekha) या नेहमीच चर्चेत राहतात. त्यांच्या दर्जेदार अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली होती. रेखा या कुठेही दिसल्या की त्याचे फोटो काढण्यासाठी पापाराझी खूप उत्सुक असतात. नुकतीच रेखा यांनी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या वेळी पापाराझींसाठी पोज देताना रेखा यांनी असं काही केलं की सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झाली आहे. व्हिडीओमध्ये रेखा या पडता पडता सावरल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. (Rekha Troll) 

खरंतर रेखा यांनी काल फ्रांसीसी फॅशन शो Christian Dior’s Fall 2023 मध्ये हजेरी लावली होती. हा कार्यक्रम मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडियाजवळ आयोजित करण्यात आला होता. यावेळी बॉलिवूड सेलिब्रिटींपासून हॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी हजेरी लावली होती. यावेळी रेखा देखील या कार्यक्रमात दिसल्या होत्या. रेखा यांचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत सुरुवातीला रेखा या पापाराझींसाठी पोज देण्यासाठी उभे राहिल्याचे दिसते. रेखा यावेळी पापाराझींना नमस्कार करण्यासाठी उभ्या होत्या पण त्यांचा तोल गेला आणि त्या मागच्या मागे पडता पडता वाचल्या. त्यानंतर रेखा सावरल्या आणि नंतर सगळ्यांना नमस्कार करत पुढे निघाल्या. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (Rekha Viral Video) 

रेखा यांच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ही फक्त एक व्यक्ती आहे जिनं तिची स्टाईल शेवटपर्यंत ठेवली. इतकंच काय तर ग्रेसनं ठेवली. दुसरा नेटकरी म्हणाला, अनिल कपूरसुद्धा हळू-हळू म्हातारा होतोय पण ही स्त्री नाही होतं. तर एक नेटकरी रेखा यांना ट्रोल करत म्हणाला, मॅडम तुम्ही किती मेकअप करता मी आठवडा भर इतका मेकअप करते. दुसरा नेटकरी म्हणाला, सगळ्यात एलिगन्ट आणि ग्रेसफूल स्त्री. तिसरा नेटकरी म्हणाला, रेखा स्वत: चं इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु करतील याची प्रतिक्षा करत आहे. त्यांनी अकाऊंट सुरु केलं तर मला रोज त्यांच्या फोटो पाहायला मिळतील. 

हेही वाचा : Bholaa Box Office Collection Day 1 : अजय देवगनच्या ‘भोला’नं पहिल्याच दिवशी केली छप्परफाड कमाई

या फॅशन शोमध्ये सोनम कपूर आहुजा, करिश्मा कपूर, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली, मीरा राजपूत, अनन्या पांडे, श्वेता बच्चन, नताशा पूनावाला इत्यादींसह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या कार्यक्रमात बॉलिवूडसोबतच हॉलिवूडचे काही सेलिब्रिटीही सहभागी झाले होते. दरम्यान, अभिनेता अर्जुन रामपाल हा त्याच्या लेकीला सपोर्ट करायला तिथे पोहोचला होता.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *