Headlines

VIDEO : रकुल आणि जॅकीच्या प्री-वेडिंग पासून लग्नापर्यंतचा व्हिडीओ आला समोर

[ad_1]

Rakul Preet Wedding Video : बॉलिवूडच्या लोकप्रिय कपल्समध्ये आता आणखी एका जोडप्याचं नाव समोर आलं आहे. ते म्हणजे रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी. त्या दोघांनी 21 फेब्रुवारी रोजी गोव्यात शाही विवाह केला. त्या दोघांनी आज शुक्रवारी 23 फेब्रुवारी रोजी त्यांच्या लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमांपासून लग्नापर्यंतचे सगळ्या कार्यक्रमांचे फोटो आणि काही क्लिप्स शेअर केले आहेत. त्या दोघांच्या लग्नाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

रकुलनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओला शेअर करत हे मी किंवा तू नाही… तर आपण आहोत…. व्हिडीओच्या सुरुवातीला रकुल प्रीत नवरीच्या लूकमध्ये दिसत आहे. जॅकी देखील नवरदेवाच्या लूकमध्ये दिसत आहे. जॅकीला पाहून रकुल डान्स करू लागते. त्यानंतर रकूल जॅकीच्या जवळ पोहोचताच तो तिला मिठी मारतो. त्यानंतर त्यांची वरमाला पाहायला मिळते. वरमाला कार्यक्रमा दरम्यान, ते दोघं मस्ती करताना दिसले. 

या व्हिडीओत लग्नाच्या काही क्लिप्ससोबत प्री वेडिंग फंक्शन्स म्हणजेच हळद आणि संगीत सेरेमनीची देखील झलक पाहायला मिळाली आहे. त्याशिवाय व्हिडीओत दोघं समुद्र किनारी मस्ती करताना दिसत आहेत. त्यांच्या लग्नाचे आणखी बरेच व्हिडीओ समोर आले आहे. त्या दोघांनी त्यांच्या लग्नाचे फोटो देखील शेअर केले होते. 

रकुल आणि जॅकीचा हा शाही विवाह गोव्याच्या ITC ग्रॅन्ड साऊथ मध्ये झालं. त्यांच्या लग्नाच्या बातमीनं त्या दोघांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. तर या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. तर त्याशिवाय अनेकांनी या व्हिडीओला गोड असल्याचे म्हटले आहे. तर रकुलचा लूक पाहून ‘तुझा नवरीचा लूक खूप सुंदर दिसत आहे.’ 

हेही वाचा : स्वप्नातील नव्हे, खरी-खुरी राजकुमारी आहे सलमानची ‘ही’ हिरोईन! ‘वयाच्या 13 व्या वर्षीच…’

त्यांच्या लग्नात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती. त्यात शाहिद कपूर त्याची पत्नी मीरा राजपूत, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा, अनन्या पांडे आणि बॉयफ्रेंड आदित्य रॉय कपूर, रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख, आयुष्मान खुराना आणि ताहिरा कश्यप, भूमि पेडनेकर आणि तिची बहीण समीक्षा पेडनेकर, ईशा देओल, वरुण धवन आणि नताशा दलाल असे अनेक सेलिब्रिटी यावेळी सहभागी होते. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *