Headlines

VIDEO: ”पोरी, मला इच्छामरणही चालेल पण…” ज्येष्ठ अभिनेत्यानं ‘कोकण हार्टेड गर्ल’कडे मागितलं काम

[ad_1]

Kokan Hearted Girl Video: सध्या सोशल मीडियावर असे अनेक इन्फ्लूएन्सर आहेत ज्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. त्यातून असे अनेक इन्फ्लूएन्सर आहेत ज्यांनी आपल्या वेगळेपणानं त्यांच्या चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत. त्यातीलच एक आहे ती म्हणजे कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता वालावलकर. सध्या तिच्या एका व्हिडीओनं सगळीकडेच धुमाकूळ घातला आहे. यावेळी तिचा व्हिडीओ पाहून सर्वांनीच तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. गिरगावात राहणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्याला ती यावेळी भेटले आणि ते तिच्याकडे ज्याप्रमाणे काम मिळेल का म्हणून विनवणी करतात त्यावरून चाहत्यांच्या डोळ्यातून पाणी आले आहे. यावेळी तिचा हा व्हिडीओ चर्चेत आला असून या व्हिडीओला 2 दिवसात 7 लाखाहून अधिक व्ह्यूज आले आहेत. 

मनमोहन माहिमकर असे त्यांचे नावं आहे. त्यांनी अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटातून कामं केली आहेत.  ‘भिकारी’, ‘ही पोरगी कोणाची’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘नानामामा’, ‘गोलमाल’, ‘जत्रा’, ‘वंटास’  अशा चित्रपटांतून ते दिसले आहेत. 

अंकिताच्या व्हिडीओ नक्की काय? 

ती या व्हिडीओमध्ये त्यांच्याशी बोलताना दिसते आहेत. यावेळी तिनं या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे की, “गिरगावमध्ये माझे एक शूट होते आणि ते सुरू असतानाच मला माहिमकर काका भेटले. ज्यांना मी लहानपणापासून स्क्रीनवर पाहत आली आहे. मी त्यांना विनंती केली की आमच्या शूटमध्ये तुम्ही सहभागी व्हाल का? मग ते लगेच तयार होऊन आले.”

हेही वाचा – संजय मोने नाही तर हा होता सुकन्या मोनेंचा पहिला क्रश? लग्नाच्या 25 वर्षांनंतर सोडलं मौन

 मला इच्छामरण सुद्धा चालेल पण… ज्येष्ठ अभिनेत्याचा आर्जव

यापुढे ती म्हणाली की, “यानंतर मी निघत असताना ते मला म्हणाले, ”मुली मला काम देशील का गं? मला कामाची खूप गरज आहे.” त्यांच्या डोळ्यातील पाणी बघून मला फार वाईट वाटलं. आज एका कलाकाराची अशी अवस्था आहे की ते माझ्याकडे काम मागत होते.” असं ती म्हणाली. ”माझं लग्न झालं नाही, माझ्याकडे वेळ घालवायला माझं कुटुंब नाही. मला इच्छामरण सुद्धा चालेल पण त्याचा अर्ज मी इथे भारतात देऊ शकत नाही. मला काम द्या जेणेकरुन माझा वेळ जाईल आणि मी त्यातून काहीतरी पैसे कमवू शकेल. मला फक्त पैसे नकोत तर काम करायचं आहे.” असा आर्जव त्यांनी तिच्याकडे केला. 

पाहा व्हिडीओ – 

चाहत्यांची मनं जिंकली 

”त्यांची या वयातील ही वाक्य ऐकून त्यांच्याकडून खरंच बरंच शिकण्यासारखं आहे. मी त्यांना सांगितलं की मी एवढी मोठी नाही की मी तुम्हाला काम देऊ शकेन, पण माझ्या संपर्कात असलेल्या सिनेसृष्टीतील लोकांपर्यंत मी तुमचा हा मेसेज नक्की पोहोचवेन. तुम्हाला नक्की काम मिळेल जेणेकरून तुमचा वेळ जाईल. तुमचं शेवटचं आयुष्य खूप सुखात जाईल”, असं अंकितानं या व्हिडीओतून म्हटलं आहे. सध्या तिची ही आपुलकी आणि माणुसकी पाहून चाहते तिच्यावर खुश झाले आहेत.  [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *