Headlines

‘दारु प्यायची तेवढी प्या, पण कधीच…’ हनी सिंगचा चाहत्यांना सल्ला, व्हिडीओ व्हायरल

[ad_1]

Honey Singh Advice Fans On Drugs : लोकप्रिय गायक आणि रॅपर अशी ओळख मिळवलेला हनी सिंग हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. पंजाबी म्यूझिक इंडस्ट्रीपासून बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर अशा यशस्वी प्रवास त्याने केला आहे. ‘देसी कलाकार’, ‘ब्लू आईज’, ‘लव्ह डोस’ या गाण्यांमुळे हनी सिंह तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला होता. हनी सिंगने आपल्या गाण्यावर सर्वांना थिरकायला लावले. करिअरमध्ये बरीच प्रसिद्धी, लोकप्रियता मिळवलेला हनी सिंग मधल्या काळात सिनेसृष्टीतून पूर्णपणे गायब झाला होता. व्यसनाच्या आहारी गेल्याने हनी सिंग यशाच्या शिखरावरुन थेट खाली आपटला. आता हनी सिंगने त्याच्या चाहत्यांना मोठा सल्ला दिला आहे. 

हनी सिंग नक्की काय म्हणाला?

सध्या हनी सिंग हा लोकप्रियता मिळवण्यासाठी धडपड करत आहे. अनेक म्युझिक अल्बम आणि लाईव्ह कॉन्सर्टद्वारे तो चाहत्यांनी मने जिंकताना दिसत आहे. आता नुकतंच त्याने एका कॉन्सर्टचे आयोजन केले होते. यावेळी हनी सिंगने त्याच्या चाहत्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. माझ्या बहिण आणि भावांनो, तुम्ही सर्व माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत. त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो की गांजा ओढू नका. या व्यसनामुळे माझ्या आयुष्यातील पाच वर्षे वाया गेली आहेत. तुम्हाला जितकी दारु प्यायची तेवढी प्या, पण चरस, गांजा कधीच ओढू नका. यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. आम्ही फक्त मनोरंजनासाठी गाणी बनवतो.” असे हनी सिंगने म्हटले आहे. 

सध्या हनी सिंगचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकरी कमेंट करताना दिसत आहेत. यावर काही जण त्याच्या या वक्तव्याची खिल्ली उडवताना दिसत आहेत. तर काही जण त्याने दिलेला सल्ला योग्य असल्याचे म्हटलं आहे. 

हनी सिंग व्यसनाच्या आहारी

दरम्यान हनी सिंग आणि बादशाह या जोडीने आतापर्यंत अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. हनी सिंगच्या अनेक गाण्यांतील रॅप बादशाहने लिहिले आहेत. सर्व हे रॅप साँग सुपरहिट झाले आहेत. हनी सिंग हा जगभरात ‘यो यो हनी सिंग’ या नावाने प्रसिद्ध आहे. . हनी सिंहने ‘अंग्रेजी बीट’,’ब्राउन रंग’,’गबरू’,’लुगी डान्स’,’पार्टी विथ भूतनाथ’,’देसी कलाकार’,’लव्ह डोज’,’सनी सनी’ अशी अनेक गाणी गायली आहेत. पण हनी सिंग हा यशाच्या शिखरावर असताना व्यसनाच्या आहारी गेला आणि त्यामुळे त्याच्या करिअरला ब्रेक लागला. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *