Headlines

VIDEO : घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान आराध्याच्या शाळेत बच्चन कुटुंबासोबत दिसली ऐश्वर्या राय, पण…

[ad_1]

Bachchan family together over separation rumours : गेल्या अनेक दिवसांपासून ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन हे त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. तर एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्यानं बच्चन कुटुंबियाचं घर सोडलं असून ती तिच्या आईसोबत राहत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या बातमीची अधिकृत बातमी समोर आलेली नाही. दरम्यान, या सगळ्यात आता बच्चन कुटुबियांचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. यात ते सगळे आराध्याला पाठिंबा देण्यासाठी धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत पोहोचले होते. यावेळी बच्चन कुटुंबातील अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, अगस्त्य नंदा आणि ऐश्वर्याची आई एकत्र दिसले. 

काल म्हणजे शुक्रवारी धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शाहरुख खान, गौरी खान, सुहाना खान, करीना कपूर, करण जोहर, शाहिद कपूर, मीरा राजपूत, रोहित शेट्टी हे सगळे सेलिब्रिटी दिसले. मात्र, सगळ्यांचं लक्ष वेधलं ते बच्चन कुटुंबानं. 

सोशल मीडियावर आराध्याचा पर्फॉर्म करतानाचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. तिनं केलेल्या अभिनयाचे लाखो चाहते झाले आहेत. आराध्याचा डान्स पर्फॉर्मन्स पाहता नेटकऱ्यांना ऐश्वर्याची आठवण आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत एक व्हिडीओ हा असा आहे ज्यात ऐश्वर्या ही आराध्याचा व्हिडीओ काढताना दिसते. तर एका व्हिडीओ संपूर्ण बच्चन कुटुंब हे इतर सेलिब्रिटींसोबत शाहरुखच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. 

हेही वाचा : ‘अखेर, आराध्याचं कपाळ पाहिलं आणि…’; ऐश्वर्याच्या लेकीचा शाळेतील व्हिडीओ पाहून नेटकरी सुसाट

दरम्यान, बच्चन कुटुंबाविषयी बोलायचं झालं तर जया बच्चन, त्यांची लेक श्वेता बच्चन आणि नव्या नवेली नंदा यावेळी कार्यक्रमात दिसले नाही. तर अगस्त्य मात्र, यावेळी दिसला. अगस्त्य हा नुकताच झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटात दिसला. या चित्रपटातून त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तर अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वीच लेक श्वेता बच्चनला त्यांचा प्रतीक्षा बंगला भेट केला. या सगळ्यानंतर ऐश्वर्या आणि संपूर्ण कुटुंबात वाद सुरु झाले. झूमनं दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून काही ठीक नाही आहे. मात्र, लेक आराध्यामुळे ते एकत्र आहेत. आता सगळ्या गोष्टी या हातातून सुटक असताना. ऐश्वर्यानं सासरचं घर सोडलं असून माहेरी आईसोबत राहते. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *