Headlines

Rishabh Pant च्या कार अपघातानंतर Urvashi Rautela नं शेअर केली ‘ही’ पोस्ट

[ad_1]

Urvashi Rautela Social Media Post After Rishabh Pant Accident : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारचा दिल्लीहून घरी परतत असताना भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रुडकीच्या नारसन गावाच्या सीमेवर ऋषभ पंतच्या कारचा हा अपघात झाला. या अपघातात पंत हा गंभीर जखमी झाला असून त्याला दिल्लीला हलवण्यात आले आहे. हा अपघात इतका भयंकर होता पंतच्या कारचा अक्षरशः कोळसा झाला आहे. दरम्यान, त्यानंतर सगळ्या नेटकऱ्यांचे लक्ष सोशल मीडियावर लागले होते. मात्र, त्या सगळ्यांचे लक्ष हे अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या (Urvashi Rautela) पोस्टनं वेधले आहे. ऋषभच्या अपघातानंतर उर्वशीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. 

उर्वशीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये उर्वशीनं तिच्या फोटोशूटमधील एक फोटो शेअर केला आहे. उर्वशीनं पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. उर्वशी या फोटोत सुंदर दिसत आहे. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे उर्वशीनं दिलेल्या कॅप्शननं वेधले आहे. उर्वशीनं हा फोटो शेअर करत प्रार्थना करत असल्याचे म्हटले आहे. उर्वशीचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

कसा झाला ऋषभ पंतचा अपघात?

दिल्लीवरून घरी परतत असताना ऋषभ पंतची कार रेलिंगला धडकली आणि हा अपघात झाला. रेलिंगला धडक दिल्यानंतर गाडीनं पेट घेतला आणि काही वेळातच ऋषभ पंतची गाडी जळून खाक झाली. सुदैवाची बाब म्हणजे या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे. मात्र, ऋषभ पंतला गंभीर जखमा झाल्या असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

हेही वाचा : Rishabh Pant Accident : ऋषभ पंतच्या गाडीला भीषण अपघात; उपचारांसाठी दिल्लीला रवाना

प्रत्यक्षदर्शींनीही ऋषभ पंतची कार रेलिंगला धडकल्यानंतर क्षणात गाडीने पेट घेतला आणि काही वेळातच ती जळून खाक झाली. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले. तर अपघातात जखमी झालेल्या ऋषभ पंतला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले आहे. शुक्रवारी पहाटे पंत त्याच्या गाडीने दिल्लीवरुन रुडकी येथून त्याच्या घरी जात होता. त्याचवेळी नारसन गावाजवळ त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याची गाडी रेलिंगला धडकून उलटली. 

ऋषभ पंतवर होणार प्लास्टिक सर्जरी ऋषभ पंतवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी प्राथमिक माहिती देताना त्याच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाल्याचे सांगितले आहे. अपघातानंतर ऋषभ पंतला सुरुवातीला जवळच्या सक्षम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सक्षम हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. सुशील नागर यांनी, “ऋषभ पंतची प्रकृती सध्या स्थिर आहे. पुढील उपचारांसाठी त्याला दिल्लीला हलवण्यात आले आहे. तिथे त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे,” अशी माहिती दिली आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *