Headlines

उर्फी जावेद अखेर मोठ्या पडद्यावर झळकणार; चित्रपटाचं नाव आणि Release Date पाहूनच घ्या

[ad_1]

Urfi Javed : राजकुमार राव आणि नुसरत भरुचा यांच्या ‘लव सेक्स और धोखा’ या चित्रपटानं सगळ्यांचे लक्ष वेधले होते. तर आता या चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्याची बातमी समोर आली आहे. हा चित्रपट येणार याची चर्चा जेव्हा पासून सुरु झाली आहे तेव्हा पासून नेटकऱ्यांना फारचं उत्सुकता लागल्याचे पाहायला मिळते. दरम्यान, आता असं म्हटलं जातं की या चित्रपटात उर्फी जावेद ही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अर्थात उर्फीचा हा डेब्यू चित्रपट असणार आहे. 

‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेदनं आधी एका मालिकेत संस्कारी सूनची भूमिका साकारली होती आता ती मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. तर या चित्रपटाची थीम ही तिच्या पर्सनॅलिटीला शोभेल अशी आहे. बालाजी टेलीफिल्म्स आणि कल्ट मूव्हीजच्या ‘लव सेक्स और धोखा 2’ या चित्रपटाचं प्रोडक्शन दिबाकर बॅनर्जी करणार आहेत. तर एकता कपूर आणि शोभा कपूर हे प्रोड्यूसर आहेत. तर हा चित्रपट 19 एप्रिल 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. असं म्हटलं जातं की या चित्रपटात मोनी रॉय आणि तुषार कपूर हे पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहेत.

दरम्यान, उर्फीच्या मालिकेविषयी बोलायचे झाले तर ती मालिकांमध्ये दिसली. ज्यात ‘ऐ मेरे हमसफर’ साठी अलावा ‘चंद्र नंदिनी’, ‘मेरी दुर्गा’, ‘साथ फेरों की हेरा फेरी’, ‘बेपनाह’, ‘डायन’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘बडे भैया’ या मालिकांमध्ये दिसली आहे. मात्र, उर्फी ही तिच्या पापाराझी आणि ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली होती. 

हेही वाचा : VIDEO : ‘बॅगेचं फक्त हॅन्डल राहिलं’; विमान कंपनीवर सिद्धार्थ जाधव संतापला

उर्फी ही तिच्या हटके फॅशन स्टाइलसाठी ओळखली जाते. अनेकदा ती सेलिब्रिटींविषयी काही बोलते त्यामुळेही ती चर्चेत राहते. उर्फीचे इन्स्टाग्रामवर 4.5 मिनियन फॉलोवर्स आहेत. तिचा सोशल मीडिया गेम हा फार छान असला तरी आता ती मोठ्या पडद्यावर कसं काम करते आणि तिच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर जादू करु शकते की नाही. याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. सध्या उर्फी सतत पापाराझींमुळे कुठे ना कुठे स्पॉट होते. त्याशिवाय तिची विचित्र फॅशन स्टायही ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहते. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *