Headlines

त्या स्किटनंतर आले धमक्यांचे फोन; समीर चौघुलेनं सांगितला धक्कादायका अनुभव

[ad_1]

Maharashtrachi Hasya Jatra Samir Choughule : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ नं सगळ्यांना वेड लावलं आहे. या कार्यक्रमाचे चाहते फक्त भारतात नाही तर परदेशात देखील आहेत. मालिकेतील सगळेच कलाकार म्हणजे समीर चौघुले, प्रसाद खांडकेर, गौरव मोरे ते दत्तू मोरे पर्यंत सगळ्याच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यातही या कार्यक्रमाची सुत्रसंचालक प्राजक्ता माळी देखील या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. या कलाकारांच्या स्किट नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकतात. त्यात अनेकदा समीर चौघुलेच्या स्किटचे सगळेच कौतुक करताना दिसतात. दरम्यान, लेखन करताना आता कोणत्या मर्यादा याविषयी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. 

समीरनं राजश्री मराठीला ही मुलाखत दिली होती. यावेळी समीर चौघुले हा लेखनावर येणाऱ्या मर्यादांविषयी बोलताना दिसला. समीर म्हणाला, ‘हास्यजत्रेतील प्रत्येक स्किटसाठी एक क्रिएटिव्ह टीम काम करत असते. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी सरांनी यात पिढ्या घडवल्या आहेत. खरंतर, त्यांचं मार्गदर्शन लाभतंय हे आमचं भाग्यचं आहे. त्यामुळे विषयांची निवड करण्यासाठी आमची एक स्वतंत्र बैठक होते. सध्याच्या काळात लेखक म्हणून अनेक बंधनं आहेत. कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण, अलीकडे लोकांच्या भावना या काचेपेक्षा नाजूक झाल्या आहेत. त्यामुळे आमची लेखकांची मिटींग जवळपास 10 तास वगैरे चालते.’

समीर चौघुले पुढे म्हणाला की ‘हास्यजत्रेतील कोणत्या कलाकारासाठी कोणती भूमिका जास्त योग्य ठरेल? या सगळ्याचा विचार आम्हा लेखकांना करावा लागतो. प्रेक्षक जेव्हा मी लिहिलेलं एखादं स्किट पाहत असतात तेव्हा संपूर्ण श्रेय माझं एकट्याचं नसतं, कारण त्यात प्रत्येक व्यक्ती काहीतरी इनपूट देत असतो. सगळ्या स्किट्सवर एकत्र मेहनत घेतली जाते. ‘अब तो हो गया…’ असं मी कधीच म्हणत नाही कारण, ही जबाबदारी खूप मोठी आहे.’

हेही वाचा : त्यांनी मला नग्न केलं अन्…; ‘या’ इन्स्टाग्राम स्टारचा धक्कादायक खुलासा

कोणत्याही स्किटचं लेखन किती कठीण आहे याविषयी सांगतना समीर म्हणाला की ‘लेखन ही सर्वात अवघड कला आहे, असं मी का म्हणतोय त्याचं एक उदाहरण सांगतो. मध्यंतरी माझ्या एका स्किटमध्ये जे लेफ्टी असतात त्यांचं हस्ताक्षर एवढं काही खास नसतं. असं एक वाक्य होतं. त्या स्किटमुळे मला काही लेफ्टी लोकांचे धमक्यांचे फोन आले. अरे, आमचं हस्ताक्षर चांगलं नाही का? असं कसं तुम्ही म्हणू शकता?… याचा अर्थ आपण आजकाल मनमोकळेपणाने कोणत्याच विषयावर बोलू शकत नाही. विनोदासाठी आपण काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो तसा प्रकार आता राहिलेला नाही. सगळ्या गोष्टी खूप संवेदनशील झाल्या आहेत.’[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *