Headlines

तुझा रूम नंबर मला समजलाय…; पाकिस्तानी कर्णधार Babar Azam ला मारण्याची धमकी

[ad_1]

सिडनी : यंदाच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान क्रिकेट टीमची सुरुवात काही फारशी चांगली झालेली नाही. आज पाकिस्तानच्या टीमने पहिला विजय नोंदवला. लागोपाठ दोन सामन्यांत पराभवाची चव चाखल्यानंतर पाकिस्तानने पहिला विजय नोंदवला आहे. दरम्यान लागोपाठच्या 2 पराभवानंतर टीमचा कर्णधार बाबर आझमला ट्रोल केलं जातंय. तर एकाने यावेळी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. या व्यक्तीने कर्णधार बाबर आझमला मारहाण करणार असल्याचं सांगितलंय.

पाकिस्तानचे लागोपाठ 2 पराभव

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला प्रबळ दावेदार मानलं जात होतं. मात्र सुपर-12 फेरीमध्ये पाकिस्तानला सलग 2 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. यामध्ये झिम्बाब्वेने पाकिस्तानविरूद्ध एक रन्सने विजय नोंदवला. या पराभवामुळे पाकिस्तानी चाहते फारच दुखावले गेले. यापैकीच एकाने सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केलाय..

बाबरला मारहाण करण्याची धमकी

झिम्बाब्वेविरुद्ध पाकिस्तानचा पराभव झाल्याने निराश झालेल्या पाकिस्तानी चाहत्याने कर्णधार बाबर आझमला मारहाण करण्याची धमकी दिलीये. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. इतकंच नाही तर या चाहत्याने बाबर आझमबद्दल अत्यंत वाईट भाषा वापरलीये. या चाहत्याच्या म्हणण्यानुसार, बाबर आझम, मी तुमच्या हॉटेलमध्ये येतोय. मला तुझा रूम नंबर समजला असून मी तुला चपलांनी मारहाण करणार आहे.”

दिग्गज व्यक्ती संतापले

दरम्यान पाकिस्तानची हालत पाहून दिग्गज व्यक्तींनीही पाकिस्तान टीम आणि कर्णधार बाबर आझमला चांगलेच खडे बोल सुनावले आहे. यामध्ये वसीम अक्रम आणि शोएब अख्तर यांचा समावेश आहे. इतकंच नव्हे तर या दिग्गजांनी टीम सिलेक्शनवर देखील सवाल उठवले आहेत.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *