Headlines

‘तुझं हृदय बंद करतोय…’, प्रशांत दामलेंनी सांगितला हार्टअटॅकनंतरचा ‘तो’ किस्सा, म्हणाले ‘ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यावर…’

[ad_1]

गेल्या अनेक वर्षांपासून मराठी सिनेसृष्टीत कार्यरत असलेले अभिनेते म्हणून प्रशांत दामलेंना ओळखले जाते. त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक लोकप्रिय नाटकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. प्रशांत दामलेंना त्यांच्या विनोदी स्वभावासाठी ओळखले जाते. प्रशांत दामले यांना 2013 हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी घडलेली एक घटना प्रशांत दामलेंनी सांगितली आहे. 

प्रशांत दामले यांनी नुकतंच सोलसम विथ सारिका या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांचे वैयक्तिक आयुष्य, करिअर आणि खासगी आयुष्यात घडलेल्या घटना यांसह विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी 11 वर्षांपूर्वी आलेला हृदयविकाराचा झटका आणि त्यानंतर रुग्णालयात घडलेल्या सर्व प्रकाराबद्दल भाष्य केले. 

गंभीर परिस्थितीत शांत कसे राहिलात?

प्रशांत दामले यांना मे 2013 मध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्यांना त्यांच्या मुलीने रुग्णालयात दाखल केले होते. यादरम्यान ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना ते आपल्या मुलीला “पाच मिनिटांत आलो गं” असं म्हणाले होते. यानंतर त्यांना अनेकांनी तुम्ही गंभीर परिस्थितीतही इतके शांत कसे काय राहिलात? असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी फारच छान पद्धतीने उत्तर दिले होते. 

‘डॉक्टर मला स्क्रिनवर सगळं दाखवत होते’

मी इतक्या गंभीर परिस्थितीत शांत राहू शकलो, कारण माझा डॉक्टरांवरचा विश्वास. एखाद्या कलाकाराच्या नाटकासाठी प्रेक्षक ज्याप्रकारे  विश्वासाने जातात, तसेच आम्ही कलाकार किंवा सर्वसामान्य प्रेक्षकही डॉक्टरांकडे विश्वासाने जातो. ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यावर डॉक्टर मला स्क्रिनवर सगळं दाखवत होते. त्यावेळी त्यांनी मला पाच-सहा सेकंद जास्त दुखेल असं सांगितलं. यानंतर त्यांनी पुन्हा चार-पाच सेकंद तुझं हृदय बंद करतोय असे म्हटले. 

माझे एक ऑपरेशन झाल्यानंतर मी अर्ध्या तासाने त्यांना माझ्या हृदयातील दुसरं ब्लॉकेजही काढून टाका, असे त्यांना सांगितले. त्यावर डॉक्टर मला म्हणाले, “जास्त हुशारी करु नकोस, तू आता माझ्या ताब्यात आहेस, आपण परवा बघू.” त्यापुढे प्रशांत दामले म्हणाले, “हा सर्वस्वी विश्वासाचा भाग आहे. तुम्ही तुमचे शरीर विश्वासाने डॉक्टरांच्या हातात दिल्यानंतर तो विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी डॉक्टरांची आहे. मला माहिती होतं की, मी काय इतक्या लवकर जाणार नाही.”

प्रशांत दामलेंची प्रकृती सध्या ठणठणीत

दरम्यान प्रशांत दामले यांची प्रकृती सध्या उत्तम आहे. प्रशांत दामले हे सध्या एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकात व्यस्त आहेत. यात त्यांच्याबरोबर कविता मेढेकर, अतुल तोडणकर, मृणाल चेंबूरकर, प्रतीक्षा शिवणकर हे कलाकार झळकत आहेत. त्याबरोबरच प्रशांत दामले हे ‘सारखं काहीतरी होतंय’ या नाटकातही झळकताना दिसत आहेत. या त्यांच्याबरोबर वर्षा उसगावकर या झळकताना दिसत आहेत. अनेक वर्षांनंतर ही जोडी रंगमंचावर पाहायला मिळत आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *