Headlines

‘तू चालं पुढं’ मालिकेतील अभिनेत्रीने खरेदी केलं नवीन घरं, पाहा झलक

[ad_1]

Prachi pisat buy new home : स्वत:चं घरं घेणं हे सर्वसामान्य लोकांप्रमाणे अनेक सेलिब्रेटींचंही स्वप्न असतं. गेल्या वर्षभरात अनेक मराठी कलाकारांनी नवीन घराचं स्वप्न अस्तित्वात आणलं आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी मुंबई, ठाणे, पुणे यांसह विविध ठिकाणी स्वत:चं घर खरेदी केले आहे. यात प्राजक्ता माळी, ऋतुजा बागवे, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, प्रसाद ओक, प्रसाद खांडेकर, सई ताम्हणकर, अक्षय केळकर यांसह अनेक कलाकारांचा समावेश आहे. या कलाकारांनी त्यांच्या घराची झलक दाखवत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीने नवीन घर खरेदी केले आहे. 

‘तू चालं पुढे’ मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात

झी मराठी वाहिनीवरील ‘तू चालं पुढे’ ही मालिका लोकप्रिय ठरली होती. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत दीपा परब, आदित्य वैद्य, धनश्री काडगावकर, प्रतिभा गोरेगांवकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. या मालिकेत तारा हे पात्र अभिनेत्री प्राची पिसाट हिने साकारलं होतं. आता प्राचीने तिच्या चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. 

व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक

प्राची पिसाट ही सोशल मीडियावर सक्रीय असते. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती अग्निदेवतेची पूजा करताना दिसत आहे. यावेळी तिने निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. या व्हिडीओला तिने नवीन सुरुवात असे कॅप्शन दिले आहे. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे. तिच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. यावर एकाने नवीन घर, अभिनंदन अशी कमेंट केली आहे. तर एकाने खूपच छान असे म्हटले आहे.

दरम्यान प्राची पिसाट ही मराठी अभिनेत्री आहे. तिने छोट्या पडद्यावरील मालिकेत सहाय्यक भूमिका साकारत सिनेसृष्टीत पदार्पण केले. ती ‘बिग बॉस मराठी’मध्येही झळकली होती. ‘नकळत सारे घडले’, ‘तू चालं पुढे’ या मालिकातही तिने काम केले आहे. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *