Headlines

‘सहनशील, सतत अत्याचार…’ अभिनेत्री तेजश्री प्रधानचं वक्तव्य चर्चेत

[ad_1]

मुंबई : अभिनेत्री तेजश्री प्रधान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्री स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखली जाते. याआधीही तिची अनेक वक्तव्य चर्चेत आली आहेत. नुकतंच तिने दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या कामाविषयी वक्तव्य केलं आहे. जे चर्चेचा विषय ठरत आहे.

अभिनेत्री तेजश्री प्रधान होणार सून मी या घरची या मालिकेतून घरा-घरात पोहचली. लवकरच अभिनेत्री नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री नवी मालिका ‘प्रेमाची गोष्ट’ येत्या ४ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तेजश्रीने साकरलेल्या भूमिका नेमक्या कशा होत्या याविषयी भाष्य केलं आहे. 

दिलेल्या मुलाखतीत तेजश्री म्हणाली की, ”मी साकारलेल्या सगळ्याच भूमिका माझ्या खूप जवळच्या आहेत. मुक्ताची भूमिका साकारताना मला कधीच विरोधाभास जाणवत नाही कारण, मी आतापर्यंत साकारलेल्या प्रत्येक भूमिकेचं काहीतरी म्हणणं असतं. ज्या सहनशील आहेत किंवा ज्यांच्यावर सतत अत्याचार होतात अशा भूमिका मी केल्या नाहीत. खऱ्या आयुष्यातही मी अशीच आहे. अन्यायाविरुद्ध उभं राहणं, पूर्वला पूर्व दिशाचं म्हणणं हा स्वभाव माझाही आहे.”

”जान्हवी, शुभ्रा किंवा आता मुक्ता असो… या अभिनेत्री कितीही प्रेमळ आणि छान वागणाऱ्या असल्या तरीही त्या नेहमी सत्य पडताळून वागतात. त्यामुळे अशा व्यक्तिरेखा साकारणं अवघड जात नाही.” असं तेजश्रीने सांगितलं. 

तेजश्रीचं हे व्यक्तव्य सध्या  चर्चेचा विषय ठरत आहे. अभिनेत्रीची अनेक वक्तव्य यााधीही चर्चेत आली आहे. पुन्हा एकदा अभिनेत्री तिच्या या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. ‘अग्गंबाई सासूबाई’मध्ये शुभ्राची भूमिका साकारली होती. तर  ‘होणार सून मी ह्या घरची’मध्ये तेजश्रीने जान्हवी हे पात्र साकारलं होतं,  आता तेजश्री नव्या मालिकेत अभिनेत्री मुक्ता हे पात्र साकारणार आहे. 

येत्या ४ सप्टेंबरपासून तेजश्रीची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तेजश्री छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा कमबॅक करत आहेत. पुन्हा एकदा तिचे चाहते तिला छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. गेल्या काही वर्षांत तेजश्री प्रधाननं छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तिच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य, प्रसन्न भाव चाहत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या मनावर कोरला गेला. तेजश्रीच्या प्रत्येक मालिकेतल्या तिच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं. तेजश्री सिरीअलप्रमाणेच तिच्या अभिनयासाठी मोठ्या पडद्यावरही नावलौकिक मिळवला आहे. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *