Headlines

‘जगात खूप कमी लोक आहेत ज्यांना…’, प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

[ad_1]

Shivani Mundhekar Special Post For Muramba : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणून मुरांबा या मालिकेला ओळखले जाते. या मालिकेत अभिनेता शशांक केतकर, शिवानी मुंढेकर आणि निशानी बोरुले हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकत आहेत. सध्या ही मालिका टीआरपीच्या यादीत टॉप 10 मध्ये पाहायला मिळते. या मालिकेत शिवानी मुंढेकर ही रमा ही भूमिका साकारत आहे. आता तिने मुरांबा या मालिकेच्या निमित्ताने खास आठवण शेअर केली आहे.

शिवानी मुंढेकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती इन्स्टाग्रामवर सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. आता ‘मुरांबा’ मालिका प्रसारित होऊन २ वर्ष पूर्ण झाली आहेत.  शिवानी मुंढेकरची ही पहिलीच मालिका आहे. यानिमित्ताने तिने एक खास पोस्ट शेअर केली आहे. शिवानीने इन्स्टाग्रामवर ‘मुरांबा’ मालिकेतील कलाकारांचे आणि सेटवरील मजा मस्तीचे फोटो पोस्ट केले आहेत. यासोबतच तिने खास कॅप्शनही दिले आहे. 

शिवानी मुंढेकर काय म्हणाली?

“मुरांबाची दोन जादूही वर्ष,  जगात खूप कमी लोक आहेत ज्यांना आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते आणि मला ती मिळाली. पहिलं सगळच special असतं… पहिलं प्रेम, पहिला पाऊस, पहिली भेट… असाच माझ्याही आयुष्यातला आजचा एक special दिवस “माझं पहिल काम” मुरांबाला २ वर्ष पूर्ण झाली.  मुरांबावर भरभरून प्रेम करणाऱ्या रसिक प्रेक्षकांचे कृतज्ञतेने आभार यापुढेही असेच प्रेम आमच्या मुरांबा मालिकेला व तुमच्या लाडक्या रमाला मिळत राहो हीच सदिच्छा”, असे शिवानी मुंढेकरने म्हटले आहे. 

शिवानीने शेअर केलेल्या या पोस्टवर तिच्या अनेक सहकलाकारांनी कमेंट केल्या आहेत. शिवानीच्या या पोस्टवर अभिनेत्री श्वेता शेवाळे हिने टाळ्या वाजवतानाचा फोटो पोस्ट केले आहेत. तर अभिनेत्री काजल काटेने लव्ह यू असे म्हटले आहे. तर अनेक चाहत्यांनीही यावर कमेंट केल्या आहेत. “रमा तुला बघता बघता मुरांबाला कधी दोन वर्ष होऊन गेली कळालच नाही…. तुझ्या आयुष्यातील प्रत्तेक क्षण नेहमी आनंदानी बहरलेलं, सुखानी फुललेला आणि तुझी सगळी स्वप्न पुर्ण होऊ हेच ईश्वराकडे माझ मागणं”, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. तर काहींनी तिच्या या पोस्टवर “अभिनंदन” अशी कमेंट केली आहे. 

दरम्यान ‘मुरांबा’ ही मालिका 14 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसारित झाली होती. या मालिकेला दोन दिवसांपूर्वीच दोन वर्षे पूर्ण झाली. या मालिकेत अभिनेता शशांक केतकर हा अक्षय हे पात्र साकारत आहे. तर शिवानी ही रमाच्या भूमिकेत झळकत आहे. त्यासोबतच या मालिकेत निशानी ही रेवा हे पात्र साकारताना दिसत आहे. या मालिकेत प्रतिमा कुलकर्णी, सुलेखा तलवलकर, शाश्वती पिंपळीकर, विश्वास नवरे, आशिष जोशी, आशुतोष वाडेकर, प्रतीक निकम, श्वेता कामात, राजश्री परुळेकर, अभिजीत चव्हाण, स्मिता शेवाळे हे कलाकार दिसत आहेत. मुरांबा ही मालिका लव्ह ट्रायअँगल स्टोरी आहे.  [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *