Headlines

मराठा योद्धांच्या उदयाची गाथा सांगणार ‘रणधुरंधर’; २०२५ मध्ये सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

[ad_1]

मुंबई : सध्या अनेक मराठी सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. तर काही सिनेमांची नुकतीच घोषणा झाली आहे. गणराज स्टुडिओ प्रस्तुत, श्रेयश जाधव दिग्दर्शित ‘रणधुरंधर..’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. मराठा योद्धांच्या उदयाची गाथा सांगणारा हा चित्रपट २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मराठी, इंग्रजी, हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड, गुजराथी आणि पंजाबी भाषेत प्रदर्शित होणार आहे. भाग्यश्री जाधव, अमित भानुशाली, अनुप अशोक देशपांडे या चित्रपटाचे निर्माता आहेत. यापूर्वीही गणराज स्टुडिओ आणि अमित भानुशाली यांनी एकत्र काम केले आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा ते या चित्रपटाच्या माध्यमातून अशीच एक दर्जेदार कलाकृती घेऊन येत आहेत. या चित्रपटात कलाकार कोण असणार, याबाबत सध्या तरी गोपनीयता आहे. पॅन इंडिया असलेला हा चित्रपट भव्यदिव्य स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘रणधुरंधर’ या चित्रपटामध्ये कोण-कोण कलकार दिसणार आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. 

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक श्रेयश जाधव म्हणतात, ”ही कहाणी वीर योद्धांची आहे, लढाईत शत्रूला भयभीत करून सोडणाऱ्या रणधुरंधराची गाथा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आम्ही या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा एक बिग बजेट चित्रपट असून याची भव्यता तुम्हाला चित्रपट पाहूनच जाणवेल.” श्रेयश जाधव यांनी यापूर्वी ‘मी पण सचिन’, ‘फकाट’ असे जबरदस्त चित्रपट सिनेसृष्टीला दिले आहेत. लवकरच त्यांचे ‘डंका हरिनामाचा’, ‘जंतर मंतर छू मंतर’ हे चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

श्रेयश जाधव (Shreyas Jadhav) दिग्दर्शित ‘रणधुरंधर..’ हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजे २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. मराठा योद्धांच्या उदयाची गाथा या चित्रपटाद्वारे सांगण्यात येणार आहे. हा चित्रपट मराठी, इंग्रजी, हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड, गुजराथी आणि पंजाबी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. भाग्यश्री जाधव, अमित भानुशाली, अनुप अशोक देशपांडे या चित्रपटाचे निर्माता आहेत. यापूर्वीही गणराज स्टुडिओ आणि अमित भानुशाली यांनी एकत्र काम केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ते या चित्रपटाच्या माध्यमातून अशीच एक दर्जेदार कलाकृती घेऊन येत आहेत. या सिनेमाची गेले अनेक दिवस प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. सध्या या सिनेमाची सगळीकडेच जोरदार चर्चा आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *