Headlines

‘शिवरायांचा छावा’ चित्रपटात हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय खलनायक राहुल देव साकारणार काकर खानची भूमिका

[ad_1]

Rahul Dev Shivrayancha Chhava : अनेक हिंदी चित्रपट व मालिकांमध्ये  खलनायक म्हणून झळकलेले अभिनेते राहुल देव आता आगामी ‘शिवरायांचा छावा’ या  चित्रपटात  ‘काकर खान’ ही खलनायकी  व्यक्त्तिरेखा साकारणार आहे. ‘शिवरायांचा छावा’ हा भव्य ऐतिहासिक पट रुपेरी पडद्यावर उलगडणारा ए.ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट प्रस्तुत आणि दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ 16 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. औरंगजेबाने बुऱ्हाणपूरची पूर्ण जबाबदारी काकर खान या अनुभवी सरदारावर सोपवली होती. लोकांवर जिझिया कर लावत काकर खानने जनतेस वेठीस धरले होते. काकर खानच्या अन्यायी राजवटीपासून छत्रपती संभाजी महाराजांनी रयतेची सुटका केली होती.   

आपल्या या भूमिकेविषयी बोलताना राहुल देव सांगतात की, ‘आजवरच्या अभिनय कारकिर्दीत अनेक खलनायकी भूमिका साकारल्या असल्या तरी  क्रूरकर्मा  ‘काकर खान’ ही ऐतिहासिक भूमिका करण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. एखादी विशेष भूमिका वठवताना अगदी भाषेपासून चालण्या बोलण्याच्या सवयी पर्यंतचे बदल करावे लागतात. काकरखान खानची भूमिका असल्याने उर्दू भाषा आत्मसात करणं मला गरजेचं होत. प्रत्येक भाषेचा स्वत:चा असा लहेजा असतो,  तो लहेजा लक्षात घेत ही भाषा मी शिकून घेतली. भाषेनंतर प्रश्न होता तो लुक्सचा. त्यामुळे देहबोलीही तितकीच बोलकी असण्याची महत्त्वाची जबाबदारी माझ्यावर होती. ती मी माझ्या अभिनयातून केली असल्याचे राहुल सांगतात.  

मल्हार पिक्चर्स कं.चे वैभव भोर, किशोर पाटकर, मधू यांनी या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सह-निर्मिती भावेश रजनीकांत पंचमतीया यांनी केली आहे. कार्यकारी निर्माता प्रखर मोदी आहेत. कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत. गाण्यांना साजेसं संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी ए. ए.फिल्म्स सांभाळत आहे.

हेही वाचा : ‘लग्नाच्या 10 वर्षांनंतर…, नवरे डोके दुखी असतात’; Valentines Day आधी ट्विंकल खन्नाची पोस्ट

या चित्रपटातील इतर स्टार कास्ट विषयी बोलायचं झालं तर मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर,भूषण पाटील, रवी काळे, समीर धर्मधिकारी, राहुल देव, विक्रम गायकवाड, भूषण  शिवतरे,अमित देशमुख, तृप्ती तोरडमल, ईशा केसकर, प्रसन्न केतकर, अभिजीत श्वेतचंद्र, ज्ञानेश वाडेकर, आशुतोष वाडेकर, बिपीन सुर्वे, दीप्ती लेले, सचिन भिल्लारे कलाकार दिसणार आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *