Headlines

गौतमी पाटीलच्या पहिल्या चित्रपटाचं पोस्टर पाहिलं का? ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

[ad_1]

Gautami Patil Movie Released Date : सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणारी डान्सर गौतमी पाटील ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. गौतमीचे लाखो चाहते आहेत. तिच्या कार्यक्रमांना प्रेक्षक चांगली गर्दी करतात. तिच्या या डान्स कार्यक्रमांतून गावोगावी पोहोचणारी गौतमी आता रुपरी पडद्यावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिचा पहिला मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटायला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख नुकतीच घोषित करण्यात आली आहे. 

गौतमी पाटीलचा ‘घुंगरु’ हा चित्रपट 15 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटांची आवड आणि त्याचसोबत गौतमीच्या चाहत्यांना या चित्रपटाविषयी चांगलीच उस्तुकता लागली आहे. मात्र, एक लक्षवेधी गोष्ट म्हणजे पोस्टर आणि ट्रेलर लॉन्च दरम्यान गौतमी तिथे उपस्थित राहणार नाही. या चित्रपटाचे चित्रिकरण सोलापूर, हंपीसह परदेशात झालं आहे. बाबा गायकवाड दिग्दर्शत या चित्रपटात लोककलावंतांच्या आयुष्य दाखविण्यात आलं आहे.  

Gautami Patil ghungaru Movie Released Date know in detail

डान्सनं सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी गौतमी आता बॉक्स ऑफिसवर देखील राज्य करणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. खरंतर हा चित्रपट गौतमीसाठी खूप खास आहे. या चित्रपटात लव्हस्टोरी, लोककलावंतांचं आयुष्य त्यांचा संघर्ष, अशा अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाबा गायकवाड यांनीच या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. तसेच तेच या चित्रपटाचे निर्माते आहेत. 

हेही वाचा : Sam Bahadur Twitter Review: ‘सॅम मानेकशॉ’ यांच्या भूमिकेत विकी कौशलनं जिंकली प्रेक्षकांची मने, आनंद महिंद्रा म्हणाले…

गौतमी पाटील आणि बाबा गायकवाड मुख्य भूमिकेत दिसतील. तसेच सुदाम केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. गौतमीच्या डान्सचे लाखो चाहते असले तरी तिच्या डान्सवर अनेक लोक आक्षेप घेत असल्याचे पाहायला मिळते. त्याशिवाय गौतमीच्या मानधनावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. तिच्या डान्सला अनेकांनी अश्लील म्हटलं आहे. त्यांच्यात प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर आणि ज्येष्ठ तमाशाकलावंत रघुवीर खेडकर यांचीही नावं आहेत. त्यांनी गौतमीच्या मानधनावर आक्षेप घेतला होता. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *