Headlines

आता नवं काय? Urvashi Rautela ला पुन्हा एकदा आली ऋषभ पंतची आठवण! पाहून नेटकऱ्यांचा संताप

[ad_1]

Urvashi Rautela : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही गेल्या काही दिवसांपासून पॅरिस फॅशन वीकमुळे चर्चेत होती. पॅरिस फॅशन वीकला गेलेली उर्वशी फ्रान्समध्ये अडकली होती. तर आता उर्वशी पुन्हा एकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. उर्वशीनं नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. उर्वशीची ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी तिनं ही पोस्ट भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतशी जोडला आहे. त्यामुळे उर्वशीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. नक्की उर्वशीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये काय म्हटलं आहे, ते जाणून घेऊया…

उर्वशीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये उर्वशीनं एका पुस्तकाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत उर्वशीनं ज्या पुस्तकाचा फोटो शेअर केला आहे. त्या पुस्तकाचं नाव ‘लव साइन्स’ असे आहे. इतकंच नाही तर उर्वशीनं पुस्तकातील पानाचा देखील एक फोटो शेअर केला आहे. यात मीन आणि तुळ राशीत असलेल्या लव्ह अफेअर विषयी सांगितले आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उर्वशीची राशी मीन आहे तर ऋषभ पंतची राशी ही तुळ आहे. 

Urvashi Rautela shares post of book hits to rishabh pant cricketers fan gets angry

उर्वशीनं सोशल मीडियावर ही स्टोरी शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, उर्वशी भयानक आहे. मला पंतसाठी खूप वाईट वाटतंय. दुसरा नेटकरी म्हणाला, देवा ही खरंच खूप भयानक आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, मला प्रश्न पडतो की हिला नक्की त्याच्यावर क्रश आहे की नक्की काय आहे. ही तर काही वेगळ्याच गोष्टी करते. पण अशा गोष्टी सोशल मीडियावर पोस्ट करत ती किती मुर्ख आहे ते दाखवून देते. 

Urvashi Rautela shares post of book hits to rishabh pant cricketers fan gets angry

उर्वशीच्या कामाविषयी बोलायाचे झाले तर ती लवकरच परवीन बाबीच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. याविषयी सांगत उर्वशीनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये उर्वशी म्हणाली होती की “परवीन बाबीसाठी बॉलिवूड अपयशी ठरलं, पण मी तुम्हाला गौरव होईल असं करून दाखवेल. ॐ नमः शिवाय। नव्या सुरुवातीवर विश्वास ठेवा.”

हेही वाचा : Baipan Bhari Deva चित्रपटाचं राज ठाकरे कनेक्शन माहितीये? खुद्द केदार शिंदे यांनीच सांगितलं…

रिपोर्ट्सनुसार, उर्वशी आणि ऋषभ पंत हे रिलेशनशिपमध्ये होते. पण त्यांच्यात काही गोष्टी बिनसल्या आणि ते विभक्त झाले. पण ऋषभ पंत बऱ्याचवेळा बोलला की तो उर्वशीला ओळखत नाही. तर उर्वशीच्या कामाविषयी बोलायचे झाले उर्वशी दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा 2: द रूल’ या चित्रपटात एक आयटम सॉंगवर डान्स करताना दिसणार आहे. यावर अजुन कोणतीही अधिकृत बातमी समोर आलेली नाही. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *