Headlines

‘जर तिसरं महायुद्ध झालं तर ते…’, बहुचर्चित ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

[ad_1]

Nach Ga Ghuma Teaser Relese : परेश मोकाशी दिग्दर्शित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. प्रत्येक स्त्री आणि तिचं विश्व काही औरचं असतं आणि अशाच बाईपणाची गोष्ट या चित्रपटातून दाखवली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पहिले पोस्टर आणि गाणे प्रदर्शित झाले. या चित्रपटाचे पोस्टर आणि गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये अनेक कलाकारांची पहिली झलक पाहायला मिळाली आहे. 

‘नाच गं घुमा’ या चित्रपटाच्या टीझरमध्ये मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सारंग साठ्ये, मायरा वायकुळ हे कलाकार दिसत आहे. यात नम्रता संभेराव ही मोलकरणीच्या भूमिकेत दिसत आहे. तर मुक्ता बर्वे, सारंग साठ्ये आणि मायरा यांचे एक कुटुंब पाहायला मिळत आहे. या टीझरच्या सुरुवातीला प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाईमागे एक कामवाली बाई असते, असा डायलॉग ऐकायला मिळत आहे. यात नम्रता ही कामावर आलेली असताना फोन बोलताना दिसत आहे. तर मुक्ताही “आता घाई आहे, आता फोनवर बोलू नका”, असे सांगताना दिसत आहे. 

त्यानंतर मुक्ता ही सारंगला मोलकरीण कामावर उशीरा येते, अशी तक्रार करताना दिसत आहे. यावर नम्रता ही विविध कारण सांगताना दिसत आहे. यानंतर मुक्ता ही वारंवार तिचं कामात कसं लक्ष नाही, ती सांगितलेली काम विसरते हे सांगताना दिसत आहे. यानंतर टीझरच्या एक हटके डायलॉग ऐकायला मिळत आहे. “जर तिसरं महायुद्ध झालं ना तर ते कामवाल्या बाईंच्या टंचाईमुळे होईल”, असा डायलॉग यात ऐकायला मिळत आहे. 

‘नाच गं घुमा’ या टीझरमध्ये डायलॉग, स्त्रियांची होणारी दगदग, मोलकरणीला ऐकावे लागणारे टोमणे यांसह अनेक गोष्टींनी उत्कंठा वाढवली आहे. या चित्रपटाच्या टीझरनंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वेने हा टीझर शेअर करताना त्याला हटके कॅप्शन दिले आहे. महाराणी आणि परीराणीच्या विश्वात सामील व्हायला तयार आहात ना? सादर आहे ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचा टीझर.. हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ १ मे २०२४ पासून जवळच्या थेटरात, असे कॅप्शन मुक्ताने दिले आहे.  

चित्रपटात झळकणार ‘हे’ कलाकार

दरम्यान ‘नाच गं घुमा’ या चित्रपटात मुक्ता बर्वे, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, शर्मिष्ठा राऊत, आशा ज्ञाते या सहा अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे लेखन मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांनी केले आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता स्वप्नील जोशी हा निर्माता म्हणून पदार्पण करत आहे. तसेच ‘नाच गं घुमा’ची निर्मिती परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी, स्वप्नील जोशी, तृप्ती पाटील, शर्मिष्ठा राऊत व तिचा पती तेजस देसाई यांनी केली आहे. हा बहुचर्चित चित्रपट 1 मे 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *