Headlines

‘गेली चार वर्षे आम्ही…’, प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत

[ad_1]

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका टीआरपीच्या यादीत कायमच टॉप १० मध्ये पाहायला मिळते.  या मालिकेतील कलाकारांचा फार मोठा चाहतावर्ग आहे. याच मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते म्हणजे मिलिंद गवळी. ते या मालिकेत अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा साकारताना दिसतात. आता त्यांनी स्टार प्रवाह वाहिनीसाठी खास पोस्ट केली आहे.

मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. मिलिंद गवळींनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी आई कुठे काय करते या मालिकेचे 175 आठवडे पूर्ण झालेल्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. याबरोबरच त्यांनी स्टार प्रवाह या वाहिनीबद्दलही भाष्य केले आहे. 

मिलिंद गवळी यांची पोस्ट

 “स्टार प्रवाह” खूप खूप अभिनंदन , खूप खूप शुभेच्छा आणि रसिक प्रेक्षक खूप खूप धन्यवाद. “175 आठवडे आघाडीचे” ही काही साधीसुधी गोष्ट नाही आहे, इतक्या विविध चॅनलमध्ये आपण सातत्याने आघाडीवर राहायचे, खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे.
हे मी सांगू शकतो कारण मी या बहुतेक सगळ्याच चॅनेलवर कामं केली आहेत. 2019 मध्ये ज्या वेळेला “आई कुठे काय करते “ ही मालिका सुरू झाली, म्हणजे जवळजवळ दोनशे आठवड्या पूर्वी , त्यावेळेला, स्टार प्रवाह ही वाहिनी पहिल्या क्रमांकावर नव्हती.

आमच्या आधी “रंग माझा वेगळा” आणि त्यानंतर काही आठवड्याने “आई कुठे काय करते” ही मालिका प्रदर्शित झाली, मग “सुख म्हणजे नक्की काय असतं” “सहकुटुंब सहपरिवार” हळूहळू या सगळ्या मालिकांची लोकप्रियता वाढत गेली तसंच या वाहिनीची सुद्धा, teamwork किंवा अतिशय talented आणि creative, स्टार प्रवाहची Team ज्यांनी आम्हा सर्व लहान मोठ्या सगळ्या कलाकारांना एक कुटुंब म्हणून वागवलं , वेळोवेळी स्टार प्रवाहच्या प्रत्येक कार्यक्रमाला आम्हा सर्व कलाकारांना कुटुंब सारखं सामील करून घेतलं, त्यामुळे गेली चार वर्षे आम्ही आमच्या Home production होम प्रोडक्शन मध्ये काम करतो आहे असंच आम्हाला वाटत आहे.

त्यामुळे आमचे कुटुंबप्रमुख राजन जी शाही त्यांची डी के पी कंपनी आणि स्टार चे हे सगळे अगदी प्रतिभावान लोक एकत्र आल्यानंतर, आमची ही मालिका आणि ही वाहिनी आघाडीवर राहण्यापासून कुणीही थांबू शकलं नाही किंवा यापुढेही थांबू शकणार नाही. (१७५ आठवडे आघाडीचे, तुमच्या आमच्या प्रेमळ नात्याचे,  महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांचे खूप खूप आभार … तुमचे प्रेम असेच कायम आमच्या सोबत राहो…) ‘Star प्रवाह’ मराठी परंपरा, मराठी प्रवाह… असे मिलिंद गवळींनी म्हटले आहे. 

दरम्यान मिलिंद गवळी यांच्या या पोस्टवर मुग्धा गोडबोले-रानडे यांनी कमेंट केली आहे. ‘तुम्ही यासाठी नक्कीच पात्र आहात’, अशी कमेंट त्यांनी केली आहे. तर एका चाहत्याने संपूर्ण टीमचे अभिनंदन असे म्हटले आहे. तर काहींनी हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *