Headlines

खऱ्या आयुष्यात अंतरा-मल्हारची जोडी आली एकत्र, लग्नाचा पहिला फोटो समोर

[ad_1]

Saorabh Choughule Yogita Chavan Marriage : सध्या मराठी सिनेसृष्टीत लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकर, स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णी, प्रथमेश लघाटे-मुग्धा वैशंपायन, सुरुची आडारकर-पियुष रानडे, अमृता देशमुख-प्रसाद जवादे, वनिता खरात-सुमित लोंढे, संकेत पाठक-सुपर्णा श्याम, दत्तू मोरे-स्वाती घुनागे यांसह अनेक कलाकार हे 2023 या वर्षात लग्नबंधनात अडकले. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी शिवानी सुर्वे अंजिक्य ननावरे, पूजा सावंत-सिद्धेश चव्हाण आणि प्रथमेश परब-क्षितीजा घोसाळकर यांनी लग्नगाठ बांधली. त्यापाठोपाठ आता आणखी एक रिल लाईफ जोडी खऱ्या आयुष्यात एकत्र आली आहे. 

कलर्स मराठी वाहिनीवरील जीव माझा गुंतला या मालिकेने दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेत अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौघुले हे प्रमुख भूमिकेत झळकले होते. या मालिकेत योगिताने अंतरा हे पात्र साकारले होते. तर सौरभ हा मल्हारच्या भूमिकेत झळकला होता. त्यामुळे जीव माझा गुंतला या मालिकेतील अंतरा-मल्हारच्या जोडीला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले. आता खऱ्या आयुष्यातही अंतरा-मल्हारची जोडी एकत्र आली आहे. अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौघुले हे दोघेही विवाहबंधनात अडकले. 

योगिता चव्हाणने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिच्या लग्नाचा फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. योगिताने अभिनेता सौरभ चौघुलेसोबत 3 मार्चला लग्नगाठ बांधली. या फोटोला तिने हटके कॅप्शन दिले आहे. “3 मार्च 2024… आयुष्यभराचा हमसफर” असे कॅप्शन देत योगिताने त्यांच्या लग्नाचा एक फोटो पोस्ट केला आहे. 

यावेळी योगिताने नऊवारी साडी परिधान केली होती. त्यासोबतच तिने टेम्पल ज्वेलरी, हातात हिरवा चुडा आणि मुंडावळ्या असा लूक केला होता. तर सौरभने पांढऱ्या रंगाचा सदरा परिधान करत त्यावर हिरवी शाल घेतली होती. त्यांच्या या रॉयल लूकची सर्वत्र चर्चा रंगली आहे. योगिताने शेअर केलेल्या फोटो सौरभ हा तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना दिसत आहे. 

योगिता आणि सौरभच्या लग्नातील फोटोवर अनेक कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री समृद्धी केळकर, कुंजिका काळविट, सिद्धार्थ खिरीड, तेजस बर्वे, साक्षी गांधी यांसह अनेक कलाकारांनी अभिनंदन म्हणत या फोटोवर कमेंट केली आहे. सौरभ-योगिताच्या लग्नाचा फोटो सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *