Headlines

‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेतील अभिनेत्याने सांगितला शूटींगचा किस्सा, म्हणाला ‘काम करताना…’

[ad_1]

हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता अक्षय म्हात्रे हा लवकरच झी मराठी वाहिनीवरील एका मालिकेत झळकणार आहे. ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेतून अक्षय म्हात्रे हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका पुन्हा लग्न करण्याच्या संकल्पनेवर आधारित आहे. यात अक्षय म्हात्रे आणि अक्षया हिंदळकर प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. या मालिकेत अक्षय हा वडिलांचे पात्र साकारत आहे. यानिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत अक्षयने त्याच्या भावना व्यक्त केल्या. 

अक्षय म्हात्रे हा या मालिकेत आकाश हे पात्र साकारणार आहे. यात त्याच्या दोन गोड मुली असल्याचे दावखण्यात आले आहे. यानिमित्ताने अक्षयने दिलेल्या मुलाखतीत मराठी सिनेसृष्टीशी त्याचं असलेले नात उलगडलं आहे. यावेळी तो म्हणाला, “11 वर्षापूर्वी माझी मराठी टीव्ही इंडस्ट्रीपासून सुरुवात झाली. माझी पहिली मालिका टेल-अ-टेल मीडिया या प्रोडक्शन हाऊससोबत होती. त्यानंतर आता येणारी ‘पुन्हा कर्तव्य आहे’ ही मालिका देखील याच निर्मिती संस्थेची आहे. त्यांनी मला पहिला ब्रेक दिला होता. त्यावेळी मी नुकतंच कॉलेज पूर्ण करुन बाहेर पडलो होतो. त्यानंतर आता इतक्या वर्षानंतर मी ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेच्या निमित्ताने परतत आहे. 

 “माझ्यासाठी ही भूमिका खूपच आव्हानात्मक”

माझ्या करिअरची सुरुवात मराठी मालिकेतून झाली. त्यावेळी कुठेतरी मनात होतं की परत मराठी मालिकेत काम करायचं. यासोबतच दुसरं कारण म्हणजे माझ्या घरचे आणि नातेवाईक. ते नेहमी मला मराठी मालिका कर, असं सांगायचे आणि आता तो योग आला. यामुळे मी आनंदी आहे. मी लग्नाच्या तयारीसाठी ब्रेक घेतला होता तेव्हा मला सरांचा कॉल आला होता. त्यांनी मला भेटायला ये असे सांगितले. मी त्यांना भेटलो, त्यांनी मला कथानक सांगितले, मी ऑडिशन दिली आणि सगळं घडत गेले, असे अक्षय म्हात्रेने म्हटले. 

“मला असं वाटत की जर मला दोन-तीन भाषांमध्ये काम करायला मिळत असेल तर त्यात माझाच फायदा आहे. माझ्या पात्राचे नाव आकाश आहे. माझ्यासाठी ही भूमिका खूपच वेगळी आणि आव्हानात्मक आहे. त्यावेळी मला दोन छोट्या मुलींच्या वडिलांची भूमिका साकारशील का असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी मी त्यांना मला काहीही हरकत नाही, असे सांगितले होते. जर भूमिका चांगली असेल तर मी ती नक्कीच करेन असे सांगितले होते.” 

“माझ्या घरातले माझी ट्रेनिंग चालू आहे असे म्हणतात”

“मी नेहमी अशा प्रोजेक्ट्सचा भाग राहिलो आहे, ज्यात काहीतरी वेगळं करायला मिळतं. मी खऱ्या आयुष्यात अजून बाबा झालेलो नाही. पण दोन लहान मुलींचा बाबा असण्याची भावना व्यक्त करण्याचे पात्र यात साकारणार आहे. माझ्यासाठी हे आव्हानात्मक असले तर मी यासाठी उत्सुक आहे. मला काम करताना खूप मज्जा येते. काम करतेवेळी खूप संयम ठेवावा लागतो. माझ्या खऱ्या आयुष्यात लहान मुलांना मी खूप आवडतो. माझ्या मित्रांच्या मुलांचा मी आवडता काका आहे, कारण त्यांच्यासोबत मी खूप मस्ती करतो. पण शूटवर तसं करू शकत नाही कारण काम ही करायचं असत. या मालिकेचे पात्र पाहून माझ्या घरातले माझी ट्रेनिंग चालू आहे, असे म्हणतात. तुला जेव्हा बाळ होईल ते खूप भाग्यवान असणार आहे. कारण त्याच्या बाबाची आधीच मस्त ट्रेनिंग होत आहे. माझी बायकोही यानिमित्ताने प्रचंड खुश आहे”, असा किस्साही अक्षयने यावेळी सांगितला. 

दरम्यान ‘पुन्हा कर्तव्य आहे’ ही मालिका हिंदीमधील ‘पुनर्विवाह’ मालिकेचा रिमेक आहे. यात अक्षया हिंदळकर, अक्षय म्हात्रे, वंदना सरदेसाई, पंकज चेंबूरकर, सुदेश म्हाशीलकर व रेयांश जुवाटकर हे कलाकार झळकणार आहेत. येत्या 18 मार्चपासून ही मालिका सुरु होणार आहे.  [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *