Headlines

‘…म्हणून आम्ही प्रशांत दामलेंची भूमिका कापली’, ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातील अभिनेत्याने केला खुलासा

[ad_1]

Prashant Damle Navra Majha Navsacha : ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाने दोन दशकं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. 2004 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटातील गाणी, डायलॉग किंवा भूमिका अजूनही सुपरहिट आहेत. सध्या या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. त्यातच आता अभिनेते जयवंत वाडकर यांनी ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटातील अनेक गुपित उघड केली. 

जयवंत वाडकर यांनी नुकतंच ‘महाMTB’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीवेळी त्यांनी ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटावेळीचे अनेक किस्से सांगितले. या चित्रपटात अभिनेते प्रशांत दामलेही झळकणार होते. पण अचानक त्यांची भूमिका कट करावी लागली, याबद्दलचा एक किस्सा जयवंत वाडकर यांनी सांगितला. 

जयवंत वाडकरांनी सांगितला मजेशीर किस्सा

यावेळी जयवंत वाडकर म्हणाले, “मला सचिन पिळगावकरांनी नवरा माझा चित्रपटात तुम्ही आहात, असं सांगितलं होतं. या चित्रपटाचे वाचन माटुंग्यातील संकुल थिएटरमध्ये झाले होते. संतोष पवारने या चित्रपटाचे लेखन केले होते. त्यावेळी या चित्रपटातील सर्व कलाकार उपस्थित होते. आम्ही बँचवर बसून वाचन करत होतो. मला फार आधीपासून घड्याळात वेळ लावायची सवय आहे. त्यानुसार वाचन सुरु होण्यापूर्वी मी सवयीप्रमाणे घड्याळात वेळ लावली. या चित्रपटाचे वाचन पूर्ण झाले, तेव्हा सव्वा तीन तास झाले होते.” 

“त्यावेळी मी, विजय पाटकर यांनी सचिन पिळगावकरांना म्हटलं, सचिनजी तीन-सव्वा तीन तास झालेत. त्यावेळी ते म्हणाले, अरे हो का? आई शप्पथ आणि त्यानंतर मग तिथेच प्रशांत दामलेंची भूमिका कट केली”, असा किस्सा जयवंत वाडकर यांनी सांगितला. 

दरम्यान ‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट आजही लोकप्रिय आहे. या चित्रपटाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, रीमा लागू, विजय पाटकर, कुलदीप पवार, सतिश तारे, प्रदीप पटवर्धन, अतुल परचुरे, आनंद अभ्यंकर, विकास समुद्रे, अली असगर, सुनिल तावडे, वैभव मांगले, मधुराणी गोखले, जॉनी लिव्हर, निर्मिती सावंत, किशोरी शहाणे, जयवंत वाडकर असे अनेक तगडे कलाकार होते. 

काही दिवसांपूर्वी नवरा माझा नवसाचा या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली. सध्या या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. सचिन पिळगावकर यांनी याबद्दल पोस्ट शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली होती. नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अलीसागर, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार अशी दिग्गज कलाकारांची फौज असणार आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *