Headlines

थेट WhatsApp वरुन डाउनलोड करा Aadhaar आणि PAN, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

[ad_1]

नवी दिल्ली: डिजीलॉकर सेवा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (Meity) द्वारे प्रदान केली जाते. ही एक ऑनलाइन डिजिटल सेवा आहे जी तुमची कागदपत्रे आणि ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी आणि शिक्षण प्रमाणपत्र यासारख्या प्रमाणपत्रांवर ऑनलाइन प्रवेश प्रदान करते. तुम्ही आधार कार्डहोल्डर असल्यास, तुमच्यासाठी एक वेगळी DigiLocker वेबसाइट आणि अॅप आहे, ज्याद्वारे प्रवेश केला जाऊ शकतो. DigiLocker च्या MyGov Helpdesk WhatsApp Chatbot वरून लोक त्यांचे आधार, PAN सहज डाउनलोड करू शकतात.

वाचा: PAN Card हरविले तरी कामं रखडणार नाही, असे करा ड्युप्लिकेट कार्डसाठी अप्लाय, पाहा स्टेप्स

MyGov हेल्पडेस्क चॅटबॉटवरून काही सोप्या फॉलो करून युजर्स आधार, पॅन, मार्कशीट आणि ड्रायव्हिंग लायसन्स सारखी अधिकृत कागदपत्रे डाउनलोड करू शकतात. अशात, डिजिलॉकर ॲपवरून तुम्हाला या सुविधेचा आनंद घ्यायचा नसेल, तर तुम्ही व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवेचा आनंद घेऊ शकता.

वाचा: Battery Tips : स्मार्टफोनचा बॅटरी बॅकअप वाढवायचा असेल तर नोट करा ‘या’ टिप्स, फोन चालेल नव्यासारखा

WhatsApp वरून आधार पॅन कसे डाउनलोड करावे ?

सर्वप्रथम, MyGov हेल्पडेस्क संपर्क क्रमांक +९१-९०१३१५१५१५ क्रमांक तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा. यानंतर व्हॉट्सॲप ओपन करा आणि कॉन्टॅक्ट लिस्ट रिफ्रेश करा. त्यानंतर शोधा आणि MyGov HelpDesk चॅटबॉट उघडा. नंतर युजर्सना MyGov हेल्पडेस्क चॅटमध्ये नमस्ते किंवा हाय टाइप करावे लागेल. या चॅटबॉटमध्ये तुम्हाला DigiLocker किंवा Cowin यापैकी एक निवडण्यास सांगितले जाईल. यानंतर तुम्हाला डिजीलॉकर सर्व्हिसेस निवडावे लागतील. त्यानंतर ‘Yes’ वर टॅप करा. यानंतर चॅटबॉट तुम्हाला डिजीलॉकर खात्याबद्दल विचारेल.

चॅटबॉट तुम्हाला तुमच्या १२-अंकी आधार क्रमांकासह तुमचे DigiLocker खाते लिंक आणि ऑथेंटिकेट करण्यास सांगेल. यानंतर आधार क्रमांक टाकावे लागेल. नंतर तुम्हाला एक OTP मिळेल. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर होईल. डिजिलॉकर खात्यासह लिंक दस्तऐवज चॅटबॉट सूचीमध्ये दिसेल. यानंतर डाउनलोड, टाइप, सेंड नंबरचा पर्याय दिसेल. अशा प्रकारे तुमचा दस्तऐवज PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल.

वाचा: Reliance Jio चे प्लान्स, एकदा रिचार्ज करा आणि वर्षभर टेन्शन फ्री राहा, सोबत १०९५ GB डेटा आणि फ्री डिस्ने + हॉटस्टार

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *