Headlines

टॅक्सी चालवली, गाड्या धुतल्या, वेटरची नोकरीही केली; फोटोतल्या ‘या’ अभिनेत्याला ओळखलता का?

[ad_1]

Swatantra Veer Savarkar Movie: बॉलिवूडचे आघाडीचे अभिनेते एका सिनेमासाठी करोडो रुपये फीस घेतात. पण एकवेळ अशी होती की त्यांना पोट भरण्यासाठी कोणतेही काम करावे लागायचे. अशाच एका अभिनेत्याचा लहानपणीचा फोटो सध्या सोशल मीडियात चर्चेत आहे. यामागचं कारण म्हणजे लहानपणी या अभिनेत्याला हॉटेलमध्ये वेटरचं काम करावं लागलं. पैशांसाठी कधी टॅक्सी चालवावी लागली. पण त्याने हिम्मत हरली नाही. या फोटोत दिसणाऱ्या अभिनेत्याला तुम्ही ओळखलात का? हा अभिनेता कोण आहे? ओळखता येईल का? त्याचे वडिल मेडिकल सर्जन आणि आई सोशल वर्कर आहे. तर त्याची बहिण डॉक्टर आहे. या अभिनेत्याकडेही कलागुणांची काही कमी नाही. असे असले तरी शिक्षण घेण्यासाठी त्याला खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. टॅक्सी चालवण्यापासून वेटर ते कार धुवण्यापर्यंतची वेगवेगळ्या प्रकारची कामे त्याने केली. कोणत्या अभिनेत्याच्या लहानपणीचा हा फोटो आहे? तुम्ही ओळखलात का?

चला, तुम्हाला थोडी हिंट देऊया. या मुलाना घोडेस्वारीचा खूप नाद आहे. सध्या तो सिनेमातून नाव कमावतोय. पण त्याचे घोडे स्वारीचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. यामुळेच त्याला घोडे स्वारीत गोल्ड मेडल मिळाले आहे. 

हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून रणदीप हुड्डा आहे. हरियाणाच्या रोहतकमध्ये जन्मलेल्या रणदीप हुडाने आपले शिक्षण बोर्डिंग मोतीलाल नेहरु स्कूल ऑफ स्पोर्ट्समधून पूर्ण केले. त्याचा छोटा भाऊ इंजिनीअर असून घरात जवळजवळ सर्वच डॉक्टर आहेत. त्यामुळे रणदीपनेदेखील डॉक्टर व्हावे अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. 

टॅक्सी चालवली, गाड्या धुतल्या 

शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर रणदीप ऑस्ट्रेलियाला गेला. तिथून त्याने पदवी पूर्ण केली. पण शिक्षण घेत असताना तिथे राहणे सोपे नव्हते. म्हणून त्याने टॅक्सी चालवणे, गाड्या धुणे आणि वेटरचे काम करणे सुरु केले. यातून जी कमाई व्हायची त्यातून तो शिक्षण आणि राहण्याचा खर्च करायचा. रणदीपने एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. 

रणदीपने आपल्या उमेदीच्या काळात मार्केटींगचा कोर्सदेखील केला. शिक्षण घेऊन तो भारतात परतला तेव्हा एअरलाइन्समध्ये मार्केटींगची नोकरी करु लागला. असेच काही दिवस गेले. यानंतर त्याने मॉडेलिंगच्या क्षेत्रात पाऊल टाकलं. येथूनच त्याला थिएटर आणि अभिनयाची आवड निर्माण झाली. पुढे जाऊन त्याने अभिनेता बनण्याचा निर्णय घेतला. 

हॉलिवूडमध्येही काम 

रणदीप हुड्डाचे थिएटरमधील काम मीरा नायर यांनी पाहिले. यानंतर मान्सून वेडिंगमध्ये त्याला संधी मिळाली. अशाप्रकारे 2001 मध्ये त्याने सिनेक्षेत्रात डेब्यु केला. आता लवकरच चो स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 2020 मध्ये त्याने एक्स्रॅक्शन सिनेमातून त्याने हॉलीवूड डेब्यूदेखील केलाय.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *