Headlines

T20 World Cup मध्ये आता ‘हा’ खेळाडू ओपनिंग करणार? रोहितच्या मनात आहे तरी काय?

[ad_1]

Rishabh Pant, KL Rahul : सध्या सुरू असलेल्या T20 World Cup ला धमाकेदार अंदाजात सुरूवात झाली. या वर्ल्ड कपमध्ये काही क्लोज एनकाऊंटर्स पहायला मिळत आहेत. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानला (Pakistan) लोळवलं तर दुसऱ्या सामन्या एकहाती नेदरलँडचा (Netherlands) पराभव केलाय. त्यामुळे आता टीम इंडियाचा सेमीफायनल प्रवास आणखी सोपा झाल्याचं दिसतंय. मात्र, असं असलं तरी रोहित शर्माचं टेन्शन आणखी वाढल्याचं पहायला मिळतंय. त्याला कारण ठरतंय भारताचा स्टार सलामीवीर KL Rahul….

भारताचा स्टार खेळाडू किंग कोहली (Virat Kohli) सध्या जबदस्त फॉर्ममध्ये आहे. तर दुसरीकडे सुर्यकुमार (Suryakumar) त्याच्या दुधारी तलवारीने लढत आहे. तर रोहित शर्माने देखील अर्धशतक ठोकत स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सलामीवीर के एल राहूलला मात्र T20 World Cup मध्ये नावाला साजेशी चमक दाखवता आली नाही.

पाकिस्तान आणि नेदरलँड दोन्ही सामन्यात केएल राहुलची (KL Rahul) बॅट शांत राहिली. राहुलला दोन डावात केवळ 13 धावा करता आल्या. हा उजव्या हाताचा सलामीवीर पाकिस्तानविरुद्ध 8 चेंडूत 4 धावा करून बाद झाला, तर नेदरलँडविरुद्ध 12 चेंडूत 9 धावांवर समाधान मानावं लागलं. त्यामुळे आता पुन्हा एकदा राहुलच्या संघातील स्थानावर प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आता रिषभ पंतला (Rishabh Pant) सलामीला पाठवा, अशी मागणी आता करण्यात येत आहे.

Rishabh Pant ओपनिंग करणार?

रिषभ आणि राहुलची तुलना केली तर राहुल बऱ्याच अंगी अव्वल राहिलाय.  टी-20 आंतरराष्‍ट्रीयमध्‍ये 2 शतके राहुलच्या नावावर आहे. असं असलं तरी रिषभ पंत (Rishabh Pant) एक्स फॅक्टर ठरू शकतो. राहुलचा ऑस्ट्रेलियातील रेकॉर्ड देखील चांगला राहिला आहे. तर ओपनिंगसाठी रिषभ पर्याय ठरू शकत नाही. त्यामुळे नेटकऱ्यांच्या मागणीत तथ्य नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

आणखी वाचा – T20 World Cup: अखेर झिम्बॉब्वेने 6 वर्षापूर्वीचा वचपा काढलाच; Mr. Bean वरून का चिडवलं जातं?

दरम्यान, टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये के एल राहूलने 68 सामन्यात 2150 धावा नावावर केल्या आहेत. तर दुसरीकडे रिषभ पंतने 62 सामन्यात 961 धावा केल्यात. त्यामुळे रिषभने राहुलची जागा घेणं योग्य नसल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता रोहित शर्मा के एल राहूलच्या जागेवर कोणता पर्याय निवडणार? की राहूलला संघात कायम ठेवणार?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *