Headlines

भगव्या रंगाच्या ड्रेसमध्ये प्रेग्नंसी फोटो शूट करणारी स्वरा भास्कर ट्रोलर्सच्या निशाण्यावर

[ad_1]

Swara Bhaskar : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही लवकरच आई होणार आहे. स्वरानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या प्रेग्नंसीची बातमी सगळ्यांना दिली. प्रेग्नंसीचा टाईमचा आनंद स्वरा घेत आहे. नुकतेच स्वरानं मॅटर्निटी फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिली आहे. काही नेटकऱ्यांनी तिची स्तुती केली आहे तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

स्वरा भास्करनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या मॅटर्निटी फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. यात स्वकानं भगव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. स्वरानं शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती सुंदर दिसत आहे. मात्र, तिला या ड्रेसमध्ये पाहून अनेकांच्या नजरा वळल्या आहेत. त्याचं कारण म्हणजे फक्त स्वराचा ड्रेस नाही तर बॅकग्राऊंड देखील भगव्या रंगाचं आहे. हे फोटो शेअर करत स्वरानं कॅप्शन दिलं की प्रेग्नंसी पण त्याला फॅशन बनवा! कॅमेऱ्यासमोर पुन्हा आल्यानं मज्जा आली. कारण ग्लॅम मोड ऑन झाला. सगळ्यांसाठी एक महत्त्वाची सुचना : प्रेग्नंसी ही कोणत्याही ग्लॅमर प्रमाणेच चांगली आहे. 

स्वरानं शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. त्यानंतर काही नेटकऱ्यांनी तिची स्तुती केली तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. एक नेटकरी म्हणाला, बॅकगाऊंडमध्ये भगवा, अंधभक्तांना अजून किती जळवणार. दुसरा नेटकरी म्हणाला, हा सनातन धर्म नाही… थोडी लाज बाळगा. तर अनेकांनी स्वराला ट्रोल केलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी स्वराला प्रेग्नंसीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

हेही वाचा : अमिताभ बच्चन यांनी सांगितला MRI चा किस्सा; नर्स येऊन म्हणाली, ‘तुम्हाला डोकचं…’

स्वरा आणि तिचा पती फहान यांनी 6 जून 2023 रोजी त्यांच्या गरोदरपणाची घोषणा केली. तेव्हापासून, स्वरानं तिच्या चाहत्यांना नवीन प्रवासाची काही झलक दिली होती. 28 ऑगस्ट रोजी स्वरानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पती फहाद अहमदसोबत काही सुंदर फोटो शेअर केले होते. एका फोटोत फहाद, स्वराच्‍या बेबी बंपसोबत दिसत आहेत. या फोटोत ते फ्लोरल-प्रिंट केलेल्या मॅक्सी ड्रेसमध्ये स्वरा खूपच सुंदर दिसत होती, तर फहादनं बेसिक शर्ट-पँट सेटमध्ये दिसला आहे. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *