Headlines

‘असे आर्टिस्ट फारच कमी असतात…’, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीबद्दल असं का म्हणाला प्रसाद खांडेकर?

[ad_1]

Prasad Khandekar Instagram Post : मराठी मालिका आणि चित्रपटविश्वात आपल्या अभिनयानं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे भार्गवी चिरमुले. ती कायमच विविध कारणांनी चर्चेत असते. भार्गवीनं मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही क्षेत्रात स्वतःची अशी जागा निर्माण केली आहे. सध्या तिच्या युट्यूब चॅनलमुळे चर्चेत आहे. आता भार्गवीच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता प्रसाद खांडेकरने एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

प्रसाद खांडेकरकडून भार्गवीला शुभेच्छा

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून प्रसाद खांडेकरला ओळखले जाते. प्रसाद हा कायमच सोशल मीडियावर सक्रीय असतो. तो विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. नुकतंच प्रसादने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने भार्गवीसोबतचा खास फोटो शेअर केला आहे. त्यासोबतच प्रसादने हटके कॅप्शन देत भार्गवीला शुभेच्छा दिल्या आहेत. 

प्रसादच्या पोस्टने वेधलं लक्ष

“दहा ते दहाची शिफ्ट ज्यावेळी काही कारणास्तव पहाटे ५ ला संपते. त्यावेळी ही एवढे उत्साही आणि सहकार्य करणारे आर्टिस्ट फारच कमी असतात, त्यापैकी एक भार्गवी तू आहेस. खूपच गोड व्यक्ती आणि कमाल अभिनेत्री आहेस. तसेच सुंदर नृत्यांगणाही आहेस. आता तर पॉडकास्टपण जोरात चाललाय बाबा. वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा मैत्रिणी” असे कॅप्शन प्रसाद खांडेकरने दिले आहे. सध्या प्रसादची ही पोस्ट व्हायरल होत आहे. 

सध्या युट्यूब चॅनलमुळे चर्चेत

दरम्यान भार्गवी ही ‘वहिनीसाहेब’ या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आली. त्यानंतर ती अनेक मालिकांमध्ये झळकली. भार्गवीने अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. भार्गवीच्या ‘वन रूम किचन’, ‘संदूक’ या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अभिनयाबरोबर भार्गवीने योगाचे प्रशिक्षणही घेतले आहे. 

आणखी वाचा : अंकिता लोखंडेबद्दल अमृता खानविलकरचे वक्तव्य, म्हणाली ‘मी तिला नेहमीच…’

काही दिवसांपूर्वी भार्गवी कलर्स मराठीवरील ‘आई मायेचं कवच’ या मालिकेत काम केले होते. यात तिने मुलीबद्दल अत्यंत पझेसिव्ह, ओव्हर प्रोटेक्टिव्ह आणि धाकात ठेवणाऱ्या आईची भूमिका साकारली होती. त्यासोबतच भार्गवी ही सध्या युट्यूब चॅनलमुळे चर्चेत आहे. यात ती अनेक कलाकार, सामाजिक व्यक्तींच्या मुलाखती घेताना दिसते.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *