Headlines

‘सुभेदार’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट; कमाईचा आकडा ऐकून बसेल सुखद धक्का

[ad_1]

मुंबई : शिवराज अष्टकातील पाचवं पुष्म सुभेदार हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटातून सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहे. या चित्रपटाला सगळीकडूनच खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.  तर आता या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला किती कमाई केली याचा आकडा समोर आला आहे.  भली मोठी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा आहे. मराठी सिनेमातील भव्यता हे या सिनेमाचं मुख्य आकर्षण आहे. 

IMDB साईटवर ‘सुभेदार’ला ‘तान्हाजी’ चित्रपटापेक्षा जास्त रेटिंग मिळाले आहेत. तर आता पहिल्या वीकेंडला या चित्रपटाने किती कमाई केली आहे. हे समोर आलं आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर याने नुकतीच एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली. त्यानुसार या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला पाच कोटींहून अधिक कमाई केली आहे. या सिनेमाला मिळणारा प्रतिसाद पाहता या सिनेमाच्या कमाईकडे सर्वांचच लक्ष लागलं होतं. आता या सिनेमाच्या कमाईचा आकडा समोर आला आहे. ही पोस्ट शेअर करत दिग्पालने कॅप्शनमध्ये लिहीलंय की, ‘सुभेदार’ सिनेमाने बॉक्स ऑफिसचा गड ही सर केला, हे सगळं तुम्हा निष्ठावंत प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच शक्य आहे…मन:पूर्वक धन्यवाद !

सुभेदार या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत चिन्मय मांडेलकर दिसला आहे. तर अजय पुरकर हे तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत दिसले आहे. याचबरोबर मृणाल कुलकर्णी,   स्मिता शेवाळे, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटातील कामासाठी या सर्वांचं खूप कौतुक होत आहे.

महाराष्ट्राच्या शिवकालीन इतिहासातील प्रत्येक पान मराठयांच्या अतुलनीय शौर्याने भरलेलं आहे. सुभेदार तान्हाजी मालुसरेंचा कोंढाण्यावरील पराक्रम, ही अशीच एक अद्वितीय सुवर्णगाथा २५ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ‘सुभेदार’ या मराठी  चित्रपटातून आपल्यासमोर उलगडणार आहे.  लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी याआधीच्या ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या चित्रपटांच्या जबरदस्त यशातून त्यांची  या विषयावरची आपली कमालीची पकड सिद्ध केली आहे. 

सध्या संपुर्ण महाराष्ट्रात सुभेदार या सिनेमाच्या शोला हाऊसफुल्लची पाटी लागलेली पहायला मिळत आहे. याआधी मराठी सिनेमातील बाईपण भारी देवा या सिनेमाने खूप चांगली कमाई केली होती. या सिनेमाने धुमाकूळ घातला होता. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *