Headlines

subhas desai criticized shinde fadnavis government on tata air bus project shift to gujarat spb 94

[ad_1]

फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्कनंतर आता सी-२९५ या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. २२ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचं ३० ऑक्टोंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दरम्यान, यावरून राज्यााचे माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.

हेही वाचा – ‘कटुता संपवाच’, ठाकरे गटाकडून फडणवीसांना आवाहन; म्हणाले “विषाला ‘बासुंदी’चा दर्जा देण्याचा…”

नेमकं काय म्हणाले सुभाष देसाई?

मागील तीन महिन्यांत महाराष्ट्राला तीन मोठे धक्के सहन करावे लागले आहे. यापूर्वी वेदान्त फॉक्सकॉन आणि रायगड येथे होणारा बल्क ड्रग्ज पार्क महाराष्ट्रापासून हिरवून घेण्यात आला होता. आता टाटा-एअरबसचा प्रकल्पही महाराष्ट्रातून गुजरातला हलवण्यात आला आहे. २२ हजार कोटींची गुंतवणूक करणारा हा प्रकल्प होता. हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा यासाठी आम्ही प्रयत्न केले होते. त्याची प्रक्रियाही व्यवस्थित सुरू होतील. मात्र, काल अचानक हा प्रकल्प गुजरात जाणार असल्याची घोषणा झाली. राज्यातील सरकार बदलल्यानंतर गेल्या तीन महिन्यात हे निर्णय झाले आहेत. विशेष म्हणजे हे प्रकल्प नेमके गुजरात या एकाच राज्यात गेले आहेत, हा केवळ योगायोग आहे का? असा प्रश्न माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विचारला आहे.

हेही वाचा – बच्चू कडू-रवी राणा वादावरून एकनाथ खडसेंची शिंदे गटावर खोचक टीका; म्हणाले, “बच्चू कडूंच्या माध्यमातून…”

महत्त्वाचे म्हणजे हे प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर या प्रकरणावर राज्य सरकार केंद्र सरकारविरोधात शब्द सुद्धा बोलत नाही. महाविकास आघाडी सरकारला दोष देण्यापलिकडे या सरकारने कोणतंही काम केलं नाही, असेही ते म्हणाले.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *