Headlines

श्रीदेवीने रोल नाकारल्याने बनली ‘शिवगामी’, आज आहे 60 कोटींची मालकीण; एका सिनेमासाठी घेते ‘इतकं’ मानधन

[ad_1]

Ramya Krishnan 53rd Birthday: एखाद्या सेलिब्रेटीने मिळवलेला पैसा, यश, प्रसिद्धी आपल्याला पटकनं दिसते. पण त्याने त्यासाठी घेतलेली मेहनत अनेक वर्षांची असते. बाहुबली सिनेमातील शिवगामीच्या भूमिकेतून प्रसिद्ध झालेली साऊथ अभिनेत्री राम्या कृष्णन यापैकीच एक आहे. अभिनय क्षेत्रात 29 वर्षाचा खडतर प्रवास केल्यानंतर तिला बाहुबली सिनेमाने यश मिळवून दिले. आज ती 53 वा वाढदिवस साजरा करत आहे. राम्या ही 60 कोटींची मालकीण आहे. तिच्या यशाची कहाणी जाणून घेऊया. अभिनेत्री रम्याने तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळमसह हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिला सिनेक्षेत्रात जवळपास 37 वर्षे झाली आहेत. तिचा हा प्रवास खूप चढ-उतारांनी भरलेला आहे. 1986 मध्ये सुरू झालेल्या आपल्या फिल्मी करिअरमध्ये रम्याने 200 हून अधिक चित्रपट केले, मात्र 2015 मध्ये आलेल्या बाहुबली या चित्रपटातून तिला लोकप्रियता मिळाली.

राम्या ही शिवगामीच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचली. तिने केलेली बाहुबलीच्या आईची भूमिका सर्वांनाच खूप आवडली होती. आता रम्याची गणना दक्षिणेतील सर्वात यशस्वी अभिनेत्रींमध्ये केली जाते. असे असले तरीही राम्या ही या भूमिकेसाठी पहिली पसंती नव्हती.

ही भूमिका एसएस राजामौली यांनी त्यावेळी बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीला  यांनी ऑफर केली होती. त्यांनी श्रीदेवीशी संपर्कही केला पण तिने ही ऑफर नाकारली. स्क्रिप्ट ऐकल्यानंतर श्रीदेवीने 6 कोटी रुपये मानधन मागितले. ही ऑफर राजामौली यांना मान्य नव्हती. पण श्रीदेवीने भूमिका नाकारल्याने ही भूमिका राम्याला देण्यात आली.  राम्याने शिवगामीच्या भूमिका ऑफर लगेच स्वीकारली. ही भूमिका राम्यासाठी मैलाचा दगड ठरली. या भूमिकेसाठी ती आजही ओळखली जाते.

वयाच्या 13 व्या वर्षी चित्रपटांमध्ये ब्रेक 

राम्याचा जन्म 15 सप्टेंबर 1970 रोजी चेन्नईमध्ये झाला. ती तमिळ चित्रपट अभिनेता, विनोदी कलाकार आणि नेता चो रामास्वामी यांची भाची आहे. राम्याला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. त्यामुळे तिच्या कुटुंबातील सदस्यांनी तिला भरतनाट्यम, कुचीपुडी आणि वेस्टर्न डान्सचे प्रशिक्षण घ्यायला प्रोत्साहन दिले. त्यानंतर राम्याने अनेक स्टेज परफॉर्मन्सही दिले.

यावेळी एका चित्रपट दिग्दर्शकाने तिला मल्याळम चित्रपट नेरम पुलुंबोलची ऑफर दिली. तेव्हा राम्या फक्त 13 वर्षांची होती. तिने ही ऑफर स्वीकारली. तिचा हा चित्रपट तीन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर 1986 मध्ये प्रदर्शित झाला होता. यापूर्वी राम्या 1985 मध्ये आलेल्या वेल्लई मनसु या तमिळ चित्रपटात दिसली होती.

राम्या 60 कोटींची मालकीण 

राम्याची एकूण संपत्ती अंदाजे 60 कोटी रुपये आहे. एका चित्रपटासाठी ती 3 ते 4 कोटी रुपये घेते. दाक्षिणात्य चित्रपट उद्योगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते. तिचे वार्षिक उत्पन्न अंदाजे 12 कोटी रुपये आहे. आहे. बाहुबलीसाठी तिला अडीच कोटी रुपये मानधन मिळाले होते. राम्याने आतापर्यंत चार फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत. याशिवाय तिला तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्काराचा विशेष पुरस्कार मिळाला होता.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *