Headlines

Sonam Kapoor नं मुलगा वायूसाठी घेतला हा मोठा निर्णय, पापाराझींना बसला धक्का

[ad_1]

Sonam Kapoor’s Big Decision on Her Son : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनम ही तिच्या फॅशनसाठी ओळखली जाते. इतकंच काय तर तिला बॉलिवूडची फॅशननिस्टा असं अनेक लोक बोलतात. काही दिवसांपूर्वी सोनमनं तिच्या मुलाला जन्म दिला असून तो आता 4 महिन्यांचा आहे. तिच्या मुलाचे नाव वायू आहे. सोनम तिच्या मुलाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना वायूची झलक देताना दिसते. पण सोनमनं आजपर्यंत तिच्या चाहत्यांना त्याच्या चेहऱ्याची जाणीव करून दिली नाही. दरम्यान, नुकतीच सोनम विमानतळावर पोहोचली असता तेथे पापाराझी सतत तिचे फोटो काढत होते. यावेळी सोनमनं वायूबद्दल जे वक्तव्य केलं तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

सोनमचा हा व्हिडीओ बॉलिवू़ड बबलनं शेअर केला आहे. या व्हिडीओत सोनम मुंबई विमानतळावर कारमधून उतरते. यावेळी सोनमच्या फॅशन स्टाइलनं प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. पुढे सोनम कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसते. दरम्यान, फोटो काढल्यानंतर सोनम पापाराझींना सांगते की आता माझा मुलगा येऊल, त्याचे फोटो काढू नका… प्लीज. त्यानंतर पापाराझी हो असं उत्तर देतात आणि त्यावर सोनम धन्यवाद असे म्हणते. 

मुंबई विमानतळावर सोनमनं काळ्या ओव्हरकोटमध्ये दिसली. सोनमचा हा ओव्हरकोट इतका मोठा आहे की सगळ्यांचे लक्ष तिच्या कपड्यांकडेच होते. सोनम कपूरने 20 ऑगस्ट रोजी एका लाडक्या मुलाला जन्म दिला आहे. मात्र, गरोदरपणात अभिनेत्रीने सोशल मीडियावर सांगितले होते की, ती कोणत्या त्रासातून जात होती.

सोनम आणि तिचा पती आनंद आहूजानं (anand ahuja) मुलाला वायू कपूर आहूजा असं नाव दिलं आहे. सोनम आणि आनंद हे 8 मे 2018 रोजी लग्न बंधनात अडकले. बरीच वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर सोनम आणि आनंद लग्न बंधनात अडकले होते. त्यांच्या लग्नाला 4 वर्षे पूर्ण झाली आहेत.  

हेही वाचा : Tunisha Sharma Property : वयाच्या 20 व्या वर्षी तुनिषा शर्माकडे इतक्या कोटींची संपत्ती, ऐकून बसेल धक्का

सोनमनं काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सोनमनं पती आनंदसोबत एक थ्रोबॅक रोमॅंटिक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत सोनमनं कॅप्शन दिलं की ‘तुझी तुलना कोणाशीही होऊ शकत नाही… आणि मी तुला मिस करते. आपल्याला एकत्र 7 वर्षे पूर्ण झाली.’ सोनमनं शेअर केलेली पोस्ट पाहून नेटकरी आश्चर्यचकीत झाले.

सोनमनं शेअर केलेल्या या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी त्या दोघांना शुभेच्छा दिल्या. पण सगळ्यां कमेंट्स पेक्षा सगळ्यांचे लक्ष हे सोनमचा पती आनंदच्या कमेंटनं वेधले आहे. सोनमच्या पोस्टवर कमेंट करत आनंद म्हणाला, ‘सोना. मे महिन्यात सात वर्षे होतील… आपण पहिल्या डेटपासून मोजायला सुरूवात करू ना..? तेव्हापासून नाही जेव्हापासून आपण फोनवर बोलायला लागलो…’ या पोस्टमुळे सोनमचा तारखांच्या बाबतीत गोंधळ झाला असे कळले आहे. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *