Headlines

Sonalee Gurav Video Viral : गौतम पाटीलनंतर मराठमोळ्या रील स्टार सोनालीचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, पोलिसात तक्रार दाखल

[ad_1]

Sonalee Gurav Video Viral : सबसे कातील कोण, असं म्हटलं तर लहान मुल पण सांगेल गौतमी पाटील (Gautami Patil). अख्खा महाराष्ट्रात तिच्या लावणी कार्यक्रमामुळे ती खूप प्रसिद्ध आहे. पण तिचा कपडे बदलताना व्हिडीओ कोणी तरी काढला आणि तो व्हायरल (Gautami Patil viral video) केला. अशा प्रकारे प्रसिद्ध तरुणींचे व्हिडीओ काढून व्हायरल करणे ही कुठलही मानसिकता आहे. हे प्रकरण ताज असताना अजून एका मराठमोळ्या इन्स्टा रील स्टार सोनाली गुरवचा (Sonali Gurav) अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

सोशल मीडियावर सोनाली गुरव ही खूप लोकप्रिय आहे. श्रुतीकची कुचकी गर्लफ्रेंड अशी तिची इन्स्टावर ओळख आहे. तरुणाशी कनेक्ट करणारे कंटेट घेऊन तिने गेल्या दोन तीन वर्षांत इन्स्टाग्रामवर अनेक रील्स आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. आज ती इन्स्टाग्रामची मराठमोळी राणी आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. (instagram reel star sonali gurav morfing obscence video viral google trends trending video)

काय आहे नेमकं प्रकरण ?

सोनालीला मॉर्फ (morfing video) करून तिचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेबद्दल खुद्द सोनालीने सोशल मीडियावर सांगितलं आहे. तेवढंच नाही तर तिने या प्रकरणाबद्दल काळाचौकी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार (Police FIR) दाखल केली आहे. नेमकं काय घडलं याबद्दल सोनालीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. 

सोनालीची पोस्ट 

काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे. एखाद्या मुलीला ज्या गोष्टीचा नुसता विचारच असह्य होईल, नेमकी ती घटना माझ्या आयुष्यात घडली. काही मित्रांचा फोन आला कि एक अश्लील मॉर्फ विडीओ सध्या वायरल होतोय. पायाखालची जमीन सरकली. पटकन सगळं सोडून कुठेतरी निघुन जावसं वाटलं. वाईट वाईट विचार येऊ लागले. हि घटना झाल्यापासून सतत माझ्या आई वडिलांचा चेहरा माझ्या समोर यायचा. कौतुकाने बघणाऱ्या नजरा हिणवू लागल्या. सगळं काही छान सुरु असताना एखाद वादळ येऊन सगळं उध्वस्त करून जातं. अगदी तसच वाटलं. आणि सगळ्यात जास्त वाईट तेव्हा वाटलं जेव्हा मला अश्लील मेसेज, इमेल्स आणि कमेंट्स येऊ लागल्या. 

लोकांना चर्चेला, मजा मारायला नवीन विषय मिळाला. खरंच एवढा वेळ आहे लोकांकडे? हि वेळ आपल्या घरच्या मुलीवरही येऊ शकते आणि मग तेव्हा आपण असेच react करणार आहोत का? याची जाणीव कशी नाही होत. काही दिवस घाबरत कसेबसे दिवस ढकलू लागले पण नंतर घरच्यांनी आणि मित्र-मैत्रिणीनी मानसिक बळ दिलं. आणि मी पोलीस स्टेशन गाठलं. कोर्टाची आणि पोलीस स्टेशनची पायरी कधीच चढू नये असं मला नेहमी वाटत. पण त्याउलट पोलिसात गेल्या गेल्या पोलिसांनी मला सहकार्य केलं आणि लगेच हालचाली सुरु झाल्या. पोलीस झपाट्याने हे कृत्य करणाऱ्याना आणि ते पसरवायला मदत करणाऱ्या लोकांवर कारवाई करत आहेत. 

मला पोलीस आणि आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. फक्त खंत हीच आहे. कि आपला समाज एवढा विकृत कसा काय झाला? कुठून येते हि विकृती. 16-17 वयाची लहान लहान पोरं देखील अश्लील केमेंट मेसेज करतात तेव्हा चीड येते. स्वतःच्याच समाजात वावरण्याची भीती वाटते. पण आता ठरवलं आहे मी जशी हि घटना झाल्यानंतरही माझ्या चाहत्यांचं, हितचिंतकांचं मनोरंजन करणं थांबवलं नाही त्यापेक्षा दुपटीने मेहनत करून तुमचं मनोरंजन करायचा प्रयत्न करत राहीन. लवकरच अश्लीलता नसलेल्या, जज न करणाऱ्या समाजात मी आणि माझ्यासारख्या अनेक मुली बागडतील हीच स्वामींचरणी प्रार्थना

पोलिसांकडून तक्रार दाखल

सोनाली गुरवने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहिता कलम 500, माहिती आणि तंत्रज्ञान कायदा कलम 65, 66 C, 67 A या कलमांनुसार गुन्हा दाखल केल्या असून पोलीस त्या व्यक्तीच्या शोध घेत आहेत. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *