Headlines

‘तो’ डायलॉग समीर वानखेडेंसाठी होता का? शाहरुखनं दिलं स्पष्टीकरण

[ad_1]

Shah Rukh Khan Jawan Dialouge : बॉलिवूडचा किंग खान शाहरुखच्या जवान या चित्रपटाचा ट्रेलर काल प्रदर्शित झाला. शाहरुखच्या टीमनं बुर्ज खलिफावर चित्रपटाच्या ट्रेलरला लॉन्च केलं. जवानचा ट्रेलर आणि त्यातल्या त्यात बुर्ज खलिफा या दोन्ही गोष्टी सगळ्याचं लक्ष वेधी असल्याचं आपल्याला नेहमी वाटतं. पण सगळ्यांचे लक्ष हे या चित्रपटातील ‘मुलाला हात लावण्याआधी, बापाशी बोल’ या डायलॉगनं वेधलं होतं. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर नेटकऱ्यांनी याचा संबंध आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी जोडला आहे. हा डायलॉग म्हणजे अप्रत्यक्षपणे समीर वानखेडे यांच्यावर भाष्य करण्यात आल्याचा दावा काही नेटकऱ्यांनी केला. दरम्यान, अखेर आता शाहरुखनं हा डायलॉग कोणासाठी आहे याविषयी खुलासा आहे. 

शाहरुखनं यावेळी त्याच्या दुबईतील या कार्यक्रमात डान्स केला. ‘चालेया गाने’ चं अरबी व्हर्जन लॉन्च केलं. चाहत्यांच्या चर्चा केल्या. इतकंच नाही तर त्याला पहिलं आणि अखेरचं बाल्ड लूकमध्ये पाहणार असं देखील शाहरुखनं यावेळी सांगितलं. दरम्यान, ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या ‘मुलाला हात लावण्याआधी, बापाशी बोल’ या डायलॉगवरून सुरु असलेली चर्चा पाहता शाहरुखनं त्यावर वक्तव्य केलं आहे. शाहरुख दुबईच्या स्टेजवर हा डायलॉग सगळ्या पालकांसाठी आहे असं म्हटलं आहे. शाहरुखनं त्याचं हसू आवरत हा डायलॉग म्हटला त्यानंतर तो म्हणाला की ‘हा डायलॉग सगळ्या आई-वडिलांसाठी आहे, देवाच्या तुमच्या सगळ्यांवर आशीर्वाद असू द्या. नेहमी आनंदी आणि निरोगी रहा. खूप खूप प्रेम.’

शाहरुखच्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्याचे पाच अवतार दाखवण्यात आले आहेत. त्याविषयी देखील शाहरुखनं त्याच्या चाहत्यांना थोडी माहिती दिली. दरम्यान, शाहरुखला पुन्हा एकदा मोठ्या स्क्रीनवर पाहण्यासाठी त्याचे चाहते उस्तुक आहेत. शाहरुखनं त्याच्या या चित्रपटानं चाहत्यांना खूप मोठी भेट दिली आहे असं अनेक नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. 

हेही वाचा : ‘मुलाला हात लावण्याआधी, बापाशी बोल,’ शाहरुख खानचा समीर वानखेडेंना इशारा; Jawan चा ट्रेलर पाहून चर्चा

शाहरुखच्या या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत नयनतार, विजय सेतुपति, सान्या मल्होत्रा, प्रियामनी, गिरिजा ओक, संजीता भटाचार्य, रिद्दी डोग्रा आणि सुनील ग्रोव्हर दिसणार आहेत. तर बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदुकोण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक एटलीनं केले आहे. तर हा चित्रपट तमिळ, तेलगू, हिंदी या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ही शाहरुख खानची पत्नी गौरी खाननं केली आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *