Headlines

‘तो माझे नग्न फोटो…’; प्रियंका चोप्राच्या दीरावर अभिनेत्रीचे गंभीर आरोप

[ad_1]

Priyanka Chopra Brother In Law Joe Jonas: अभिनेत्री प्रियंका चोप्राचा दीर जो जॉनसच्या घटस्फोटाची सध्या अमेरिकन मनोरंजन सृष्टीमध्ये चांगलीच चर्चा आहे. सोफिया टर्नरबरोबरचं नातं जो ने संपवलं आहे. या घटस्फोटासंदर्भात चर्चा सुरु असतानाच निकालोडियनमध्ये काम केलेली अभिनेत्री अॅलेक्स निकोलसने जो जॉनसवर गंभीर आरोप केले आहेत. मी तरुण असल्यापासून जो जॉनसला ओळखायचे. टीनेजर म्हणजेच तारुण्यामध्ये जो जॉनस माझ्याकडे अनेकदा तो माझे न्यूड्स (नग्न फोटो) मागायचा, असं निकोलसने म्हटलं आहे. निकोलसने ‘एक्स’वरुन (ट्वीटरवरुन) हे धक्कादायक आरोप केले आहेत. निकोलस ही ‘झोयी 101’ या मालिकेमधील कलाकारांपैकी एक आहे.

ती नक्की काय म्हणाली?

आम्ही फार तरुण असताना पहिल्यांदा भेटलो होतो, असं निकोलसने जो जॉनसबरोबरच्या पहिल्या भेटीबद्दलची आठवण सांगताना नमूद केलं आहे. तो जगाला दाखवतो तितका साधाभोळा नक्कीच नाही, असंही निकोलसने म्हटलं आहे. “मी जो जॉनसला अगदी तरुण असताना भेटले होते. हा स्वत: प्युरिटी रिंग वापरायचा आणि न्यूड्स मागवायचा असा होता,” असं निकोलसने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

प्युरिटी रिंग काय प्रकार?

प्युरिटी रिंग ही एक प्रकारची अंगठी होती जी जोनस ब्रदर्सचे सदस्य परिधान करायचे. पहिल्यांदा प्रसिद्धी मिळाल्यानंतर लग्न होईपर्यंत आम्ही कधीच शरीरसंबंध ठेवलेले नाहीत हे दर्शवण्यासाठी या रिंग वापरल्या जायच्या. मात्र 2013 साली या बॅण्डमधील प्रियंकाचा नवरा म्हणजेच निक जोनाससहीत सर्वच सदस्यांनी या रिंग काढून टाकल्या. आपण व्हर्जिन (एकदाही शरीरसंबंध न ठेवणारे) नाही असं या बॅण्डच्या सदस्यांनी जाहीर केलं. जोनस कुटुंब हे पारंपारिक ख्रिश्चन धर्माला मानतं. जोनस बंधूंचे पालकही फार धार्मिक आहेत.

20 व्या वर्षी आपण पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवले

जो जॉनसने यापूर्वीच वयाच्या 20 व्या वर्षी आपण पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवल्याचं जाहीर केलं होतं. जो जॉनसने नेमके कोणाबरोबर संबंध ठेवले याची घोषणा केली नव्हती. मात्र आपण योग्य माणसासाठी वाट पाहत होतो आणि हे वेळ बघणं कामी आलं असं जो जॉनसने म्हटलं. 

पत्नीने केला होता हल्लाबोल

निकोलसने जो जॉनस हा प्युरिटी रिंग वापरत असतानाही लैंगिक संबंधासंदर्भातील गोष्टींबद्दल सक्रीयपणे सहभागी होता असं म्हटलं आहे. जो जॉनसपासून वेगळ्या झालेल्या सोफिया टर्नरनेही आपल्या नवऱ्याबद्दल मस्करीत बोलताना, “जोनास बंधूंची कुटुंब हे द्वेष करणारे आहेत,” असं म्हटलं होतं. जोनस बंधूंपैकी सर्वात वयस्कर सदस्य हा केवळ त्या प्युरिटी रिंगबरोबर नाही तर सहकलाकार, अभिनेत्री आणि सुपरमॉडल्सबरोबरही खेळत होता, असं सोफियाने म्हटलं होतं. 

लग्न टिकवण्याचा प्रयत्न

जो जॉनस आणि सोफिया टर्नर वेगळे होत असल्याचं समजल्यानंतर अनेकांनी सोफियाची बाजू घेतली आहे. जो जॉनसने सोफिया आई म्हणून जबाबदाऱ्या पार पडत नसल्याचा आरोप केला आहे. दोघांनी आपलं लग्न टीकवण्याचा फार प्रयत्न केला. मात्र कुटुंबाचं हित लक्षात घेत वेगळं होण्याचा निर्णय घेतला.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *