Headlines

Smartphone Tips: फोनचा स्पीकर खराब झालाय ? या टिप्सची मदत घ्या, खर्च करावा लागणार नाही

[ad_1]

Smartphone Speakers: अचानक फोनमधून कमी आवाज येत असल्याची तक्रार अनेक युजर करतात. पण, हे नक्की का होते याची अनेकांना कल्पना नसते. यामागे वेग-वेगळी कारणं असू शकतात. त्यापैकी एक म्हणजे फोनच्या स्पीकरमध्ये साचलेची अस्वच्छता किंवा धूळ. युजर्स याकडे फारसे लक्ष देत नाही.फोनच्या स्पीकरमध्ये धूळ किंवा अस्वच्छता जमा झाल्यामुळे फोनचा स्पीकर जॅम होतो आणि फोनमधून आवाज कमी येऊ लागतो. अशात, युजर्सना असे वाटते की, फोनचा स्पीकर खराब झाला आहे आणि ते दुरुस्त किंवा बदलण्यासाठी सर्व्हिस सेंटरची वाट धरतात. पण, प्रत्यक्षात अनेकदा ही समस्या इतकी मोठी नसतेच. तुमच्याही फोनच्या स्पीकरमध्ये अशा प्रकारची अडचण येत असेल. तर,आता काळजीचे कारण नाही. काही, सोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही कुठेही न जाता घरी बसल्या तुमच्या फोनचा स्पीकर क्लीन करू शकता. कसे ते जाणून घेऊया.

Cleaning

cleaning

स्वच्छ कापड मदत करेल: अनेक युजर्स स्मार्टफोन वापरताना योग्य ती काळजी घेत नाही. तसेच, त्याच्या देखभालीकडे देखील लक्ष देत नाही. परिणामी पोर्ट आणि स्पीकरमध्ये धूळ जमा व्हायला लागते. असे झाल्यास कॉलमध्ये देखील अडथळा येऊ शकतो. हे टाळायचे असल्यास स्मार्टफोन वेळोवेळी स्वच्छ सुती कापडाने स्वच्छ करावेत. यामुळे पोर्ट आणि स्पीकर स्वच्छ राहतात. परंतु, कापडाच्या पोर्टमध्ये सूत, रुई राहणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. स्मार्टफोनच्या स्पिकरची स्वच्छता करताना वापरयाचे कापड चांगल्या दर्जाचे असणे आवश्यक आहे.

वाचा :Laptop Online ऑर्डर करणे पडले महागात, सव्वा लाखाच्या डिव्हाइस ऐवजी मिळाले डॉग फूड

Using Brush

using-brush

सॉफ्ट ब्रशने स्पीकर स्वच्छ करा: ज्याप्रमाणे स्मार्टफोन हाताळताना विशेष काळजी घ्यावी लागते.त्याचप्रमाणे डिव्हाइस क्लिन करताना देखील लक्ष देणे आवश्यक आहे. फोन स्पीकर घरामध्ये स्वच्छ करण्याचा एक मार्ग म्हणजे ब्रशची मदत घेणे. हे ऐकायला विचित्र वाटत असेल, पण हे खरे आहे. यासाठी तुम्हाला मऊ ब्रिस्टल ब्रश घ्यावा लागेल आणि नंतर फोनचा स्पीकर हलक्या हाताने स्वच्छ करावा लागेल. अनेक वेळा फोनमध्ये मोठया प्रमाणात अस्वच्छता साचल्याने फोनचा स्पीकर काम करणे बंद करतो. अशात त्याची योग्य पद्धतीने क्लिनींग करणे आवश्यक आहे.

वाचा : Xiaomi ची ऑफर ! या सुपरहिट 5G फोनवर मिळतोय १२,००० रुपयांपर्यंतचा डिस्काउंट

Sticky Tape

sticky-tape

कॉम्प्रेस्ड एअर: तुम्ही स्पीकर ग्रिल कॉम्प्रेस्ड एअरने देखील क्लिन करू शकता. यासाठी इंडस्ट्रियल स्ट्रेन्थ एयरपंप अजिबात वापरू नका. कॉम्प्रेस्ड एअरने स्पीकर स्वच्छ केल्यास स्पीकरच्या ग्रिलमध्ये साचलेली अस्वच्छता निघून जाते.

स्टिकी टेपची मदत घ्या: या कामात स्टिकी टेप खूप मदत करू शकते. तुम्ही स्टिकी टेप लावून तुमच्या फोनचा अस्वछ स्पीकर स्वच्छ करू शकता. चिकट टेपचा एक छोटा तुकडा घ्या आणि स्पीकरला घट्टपणे लावा. नंतर काढून टाका. पण लक्षात ठेवा की टेपचा गोंद आत राहता काम नये.

Cleaning kit

cleaning-kit

तुमच्याकडे प्रोफेशनल मोबाइल क्लीनिंग किट असणे आवश्यक आहे : अनेक जण घरी उपलब्ध असलेल्या टूल्सच्या मदतीनेच स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही सारखे डिव्हाइसेस क्लीन करण्याचा प्रयत्न करतात. तुम्हीही असे करत असाल किंवा करण्याच्या विचारात असाल तर, तुम्हाला हे लक्षात ठेवण्याची गरज आहे की, तुम्हाला तुमचे कोणतेही Gadget / Smartphone घरी रिपेयर करायचे असेल तर तुमच्याकडे मोबाईल क्लिनिंग किट असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला एकदा पैसे खर्च करावे लागतील आणि ते नेहमी वापरू शकाल.

वाचा:जगभरात या ६ स्मार्टफोन्सला श्रीमंतांची पसंती, किंमतीपासून मॉडेल्सपर्यंत जाणून घ्या

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *