Headlines

पावसाळ्यात खराब होऊ शकतो स्मार्ट टीव्ही, आजच बदला या गोष्टी

[ad_1]

सध्या जोरात पाऊस बरसत आहे. तुमच्या घरात जर स्मार्ट टीव्ही असेल तर तुम्ही या टीव्हीची काळजी घ्यायला हवी. दरम्यान, स्मार्ट टीव्हीची सुरक्षा ठेवण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. जाणून घ्या डिटेल्स.

वायरिंगची तपासणी करा
पावसाळ्यात वायरिंगला नुकसान होण्याची भीती असते. जर तुमच्या जवळपास वायरिंगसाठी धोका जाणवत असेल तर लगेच याला ठीक करून घ्या. यासाठी ज्याला पुरेसी माहिती असेल त्याचा सल्ला घ्या.

वातावरणाची माहिती ठेवा
स्मार्ट टीव्हीला नेहमी पावसापासून दूर ठेवा. टीव्हीवर पाणी पडणार नाही, याची काळजी घ्या. तसेच वायरलेस इंटरनेट रूटरला सुरक्षित स्थानावर ठेवा.

वाचाः HP Laptop वर सुरू झाला खास सेल, मिळतोय २५ हजाराचा डिस्काउंट

स्विच आणि व्होल्टेज सुरक्षा
तुमच्या स्मार्ट टीव्हीला सुरक्षित ठेवण्यासाठी स्विच आणि व्होल्टेजची सुरक्षेवर लक्ष द्या. जर विजेची समस्या येत असेल तर तुमचा टीव्ही खराब होऊ शकतो. त्यामुळे एक व्होल्टेज स्टेबलायझर किंवा यूपीएसचा वापर करा.

वाचाः नव्या रंगात येताच Motorola Edge 40 चा धुमाकूळ, पाहा डिटेल्स

स्मार्ट टीव्हीला सुक्या हाताने हाताळा
ज्यावेळी तुम्ही स्मार्ट टीव्हीचा वापर करीत असाल त्यावेळी हात ओली नसतील हे पाहा. ओल्या हाताने टीव्हीचे बटन्स, रिमोट किंवा टचस्क्रीनला हात लावल्यास इलेक्ट्रिक शॉक लागण्याची भीती असते. या टिप्सच्या मदतीने तुम्ही स्मार्ट टीव्हीला सुरक्षित ठेऊ शकता.

वाचाः ४० हजारात मिळतोय दीड लाखाचा iPhone 14 Pro Max, ही ऑफर कंपनीची नाही

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *