Headlines

आईवरून शिवीगाळ करणाऱ्या नेटकऱ्याला Siddharth Jadhav नं फटकारलं, म्हणाला…

[ad_1]

Siddharth Jadhav : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव हा चांगलाच चर्चेत असतो. सिद्धार्थनं फक्त मराठी चित्रपटसृष्टीत नाही तर बॉलिवूडमध्येही स्वत: चे स्थान मिळवले आहे. अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये सिद्धार्थ जाधव दिसतो. इतकंच काय तर त्याची हटके ड्रेसिंग स्टाईलमुळे त्याला मराठी चित्रपटसृष्टीतील रणवीर सिंग म्हणून ओळख मिळाली आहे. सिद्धार्थ सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. त्याच्या पोस्टवर एका नेटकऱ्यानं कमेंट करत आईवरून शिवी दिली आहे. आईवरून दिलेली शिवी पाहता सिद्धार्थनं चाहत्यावर संताप व्यक्त केला आहे. 

सिद्धार्थ सध्या त्याच्या दोन्ही लेकींसोबत लंडनमध्ये ट्रिपचा आनंद घेत आहे. तिथले अनेक फोटो आणि व्हिडीओ सिद्धार्थ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करताना दिसतो. त्यावर अनेक नेटकरी त्यांचा आनंद व्यक्त करताना दिसतात. दरम्यान, एका नेटकऱ्यानं थेट सिद्धार्थला आईवरून शिवी घातली आहे. हे पाहताना सिद्धार्थही संतापला आणि त्यानं थेट इन्स्टाग्राम स्टोरीवरून त्या कमेंटचा फोटो शेअर केला आहे. या स्क्रिनशॉर्ट त्या नेटकऱ्याची कमेंट दिसत असून तो म्हणाला आहे की “अरे बावळट बोर्डच्या सिद्ध कितीवर एक्टिंग करशील मा**** काल्या”. हा स्क्रिन शॉर्ट शेअर करत सिद्धार्थ कॅप्शन देत म्हणाला की  “ट्रोलिंग मान्य आहे, पण शिवी देणं कितपत योग्य आहे? हा फक्त विचार आहे”. 

Siddharth Jadhav slams netizen over abuse and using bad words for mother

दरम्यान, सिद्धार्थनं नुकतीच लॉर्ड्सच्या मैदानात हजेरी लावली होती. यावेळी सिद्धार्थनं लॉर्ड्सच्या प्रत्येक कोपऱ्याची एक झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तर तो फक्त त्याच्याच ट्रिपचा आनंद घेत नसून मुलीं सोबत त्यांच्या आवडत्या गोष्टी करताना दिसत आहे. सिद्धार्थं वॉल्ट डिझ्नी अ‍ॅनिमेशन स्टुडिओची निर्मिती असलेल्या आणि सगळ्या लहाण मुलीच्या आवडत्या फ्रोजन या चित्रपटाच्या म्युझिकल प्रोग्राम पाहायला मुलींसोबत थिएटरमध्ये पोहोचला होता. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

हेही वाचा : 

दरम्यान, सिद्धार्थच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तो नुकताच सर्कस या बॉलिवूड चित्रपटामध्ये दिसला होता. त्या आधी तो ‘तमाशा लाईव्ह’, ‘दे धक्का 2’, ‘बालभारती’ या चित्रपटांमध्ये देखील दिसला. आता सिद्धार्थ लंडनला असून तो ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाची स्टार कास्टविषयी बोलायचे झाले तर सिद्धार्थ जाधवसोबत या चित्रपटात जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, विराट मडके, हार्दिक जोशी, सत्या मांजरेकर, अक्षय कुमार, नवाब खान आणि प्रवीण तरडे या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *