Headlines

‘मला हेच हवं होतं…’, सिद्धार्थ चांदेकर असं का म्हणाला?

[ad_1]

Siddharth Chandekar Movies Instagram : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून सिद्धार्थ चांदेकरला ओळखले जाते. त्याने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सिद्धार्थने चित्रपट, मालिका आणि वेबसीरिज अशा तिन्ही माध्यमातून अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या सिद्धार्थ हा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. सिद्धार्थची मुख्य भूमिका असलेला ‘झिम्मा’, ‘ओले आले’ आणि ‘श्री देवी प्रसन्न’ हे चित्रपट चांगलेच गाजले. आता या चित्रपटांसाठी सिद्धार्थने खास पोस्ट शेअर केली आहे. 

सिद्धार्थ चांदेकर हा सोशल मीडियावर सक्रीय असतो. नुकतंच सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत सिद्धार्थने त्याच्या तीन चित्रपटांचे पोस्टर पाहायला मिळत आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्याने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. 

सिद्धार्थ चांदेकरची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत

“3 चित्रपट, 108 दिवस, 16 हाऊसफुल आठवडे आणि हजारो आनंदी चेहरे. मला हेच हवं होतं आणि मी कायमच हे करत राहिन. अशाप्रकारे बॉक्स ऑफिस गाजवणं हे एक स्वप्न होते आणि आता मला ते आणखी हवं आहे. या वर्षाच्या शेवटी मी काहीतरी सुंदर घेऊन नक्कीच तुमच्या भेटीला येईल. तरी तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. कृतज्ञ. ओले आले हा चित्रपट अजूनही तुम्हाला चित्रपटगृहात जाऊन पाहता येईल”, असे सिद्धार्थ चांदेकरने म्हटले आहे. 

सिद्धार्थ चांदेकरच्या या पोस्टवर अभिनेत्री क्षिती जोगने कमेंट केली आहे. त्यावर तिने “मला तुझा खूप खूप अभिमान वाटतो” असे म्हटले आहे. तर अभिनेत्री गायत्री दातारने “खूप खूप अभिमान सिद्धी”, असे म्हणत कमेंट केली आहे. त्याबरोबरच प्रिया बापटने “सिद्ध्या तुझ्यासाठी मी खूप आनंदी आहे”, असे म्हटले आहे. सिद्धार्थच्या या पोस्टवर अनेक कलाकारांसह चाहत्यांच्याही कमेंट पाहायला मिळत आहेत. 

सलग तीन चित्रपट ठरले सुपरहिट

दरम्यान सिद्धार्थ चांदेकरच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर आतापर्यंत त्याने अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. काही दिवसांपूर्वीच तो ‘झिम्मा 2’ या चित्रपटात झळकला. त्यानंतर त्याची प्रमुख भूमिका असलेला ‘ओले आले’ आणि ‘श्रीदेवी प्रसन्न’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. हे सर्व चित्रपट सुपरहिट ठरले होते.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *