Headlines

Shreyas Talpade : ‘तब्बल 10 मिनिटांसाठी त्याच्या हृदयाची धडधड थांबली अन्…’, बॉबी देओलने केला धक्कादायक खुलासा!

[ad_1]

Shreyas Talpade Health Update : आपल्या दमदार अभिनयाने केवळ मराठीच नव्हे तर, हिंदी मनोरंजन विश्व गाजवणारा अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) याच्यासोबत धक्कादायक घटना घडली. ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या शूटिंगवरून घरी परतल्यावर श्रेयसला अस्वस्थ वाटत होतं. त्यानंतर तो अचानक बेशुद्ध पडला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, तेव्हा 10 मिनिटांसाठी त्याचं हृदय बंद (Heart Attack) पडलं होतं, अशी माहिती समोर आली आहे. शुटिंग संपल्यानंतर ही घटना घडल्याने बॉलिवूड विश्वात खळबळ उडाल्याचं समोर आलंय. अशातच श्रेयसचा खास मित्र बॉबी देओलने (Bobby Deol) नेमकं काय झालं? याची खुलासा केला आहे.

चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना हृदयविकाराचा झटका आल्याचं समोर आलंय. श्रेयसने पूर्ण दिवस शूटिंग केली. त्यावेळी तो एकदम व्यवस्थित होता. यानंतर त्याने अॅक्शन सीनही शूट केला होता. शूटिंग संपल्यानंतर तो घरी निघाला असताना पत्नीला अस्वस्थ वाटल्याचं सांगितलं. त्यावर बॉबीने त्याच्या प्रकृतीची माहिती घेतली असून एका मुलाखतीत बोलताना धक्कादायक खुलासा केला आहे. 

काय म्हणाला Bobby Deol?

मी फक्त त्याच्या पत्नीशी बोललो. ती खरंच अस्वस्थ झाली होती. एक दोन मिनिट नाही तर त्याचं हृदय दहा मिनिटे बंद पडलं होतं. आता तो ठिक असून त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. त्यामुळे तो लवकर बरा होऊन घरी परतेल एवढीच प्रार्थना, असं बॉबी देओल याने म्हटलं आहे. तो स्टार कलाकार आहे. तो लवकर बरा व्हावा, एवढीच अपेक्षा, असंही बॉबीने म्हटलं आहे.

आणखी वाचा – Shreyas Talpade: हार्ट अटॅक येण्यापूर्वी श्रेयस तळपदेसोबत नेमकं काय झालं? जाणून घ्या

दरम्यान, श्रेयस तळपदे सध्या मुंबईमध्ये ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाचं करत होता. या चित्रपटात मोठी स्टारकास्ट आहे. या सिनेमात अक्षय कुमार, जॅकलीन फर्नांडिस, दिशा पटानी, संजय दत्त, आर्शद वारसी, सुनील शेट्टी, रवीना टंडन, लारा दत्ता, जॉनी लीवर, राजपाल यादव, किकू शारदा, कृष्णा अभिषेक, परेश रावल, तुषार कपूर ही या सिनेमाची स्टारकास्ट आहे. हा सिनेमा 20 डिसेंबर 2024 ला रिलीज होणार असून याचं शूटिंग सध्या सुरु झालंय.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *