Headlines

Priyanka Chopra ने ‘या’ एका व्यक्तीमुळे सोडलं बॉलिवूड; कंगना रणौतचं धक्कादायक वक्तव्य

[ad_1]

Kangana Ranaut On Priyanka Chopra Leaving The Country : अभिनेत्री प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यानंतर अचानक प्रियांका हॉलिवूडकडे वळाली. दरम्यान, प्रियांकानं इतका मोठा निर्मय का घेतला त्याचा खुलासा नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला. प्रियांका बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या राजकारणाला आणि तिला ज्या प्रकारे कॉर्नर करण्यात येत होतं त्याला कंटाळली होती. त्यामुळे तिनं हॉलिवूडकडे वळण्याचा निर्णय घेतला होता. तिच्या या वक्तव्यावर आता बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतनं (Kangana Ranaut) दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरला (Karan Johar)  कारणीभूत ठरवले आहे. 

कंगनानं तिच्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कंगनानं करण जोहरवर निशाणा साधत त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. प्रियांका चोप्राला बॉलिवूडविषयी हेच बोलायचं आहे. लोकांनी तिच्या विरोधात गॅंगअप केलं. तिला धमक्या दिल्या आणि तिला चित्रपटातू बाहेर काढलं. त्यांनी एका सेल्फ मेड महिलेला भारतातून बाहेर जाण्यास भाग पाडले. सगळ्यांना माहित आहे करण जोहरनं तिच्यावर बॅन आणलं होतं. 

पुढे कंगनानं आणखी एक ट्वीट केलं आहे की, माध्यमांनी तिच्या आणि करण जोहरमध्ये असलेल्या मतभेदांबद्दल खूप लिहिलं. त्याचं कारण म्हणजे शाहरुख खान आणि चित्रपट माफिया क्रुएला यांच्याशी असलेली करणची मैत्री. हा नेहमीच असुरक्षित आउटसाइडर्सना शोधत असतो आणि त्याला प्रियांका चोप्राच्या रुपात पंचिंग बॅग मिळाली. त्यानं तिला इतका त्रास दिला की तिला देशसोडून जावं लागलं. (Kangana Ranaut On Priyanka Chopra Leaving The Country) 

हेही वाचा : Big Band Theory मुळे नवा वाद, Madhuri Dixit चा उल्लेख थेट…! चाहत्यांमध्ये संताप, नेटफ्लिक्सला नोटीस

कंगना पुढच्या ट्वीटमध्ये म्हणाली, ‘या मत्सरी आणि वाईट व्यक्तीला चित्रपट उद्योगाची संस्कृती आणि वातावरण खराब करण्यासाठी जबाबदार ठरवले पाहिजे. हे सगळं AB किंवा SRK यांच्यासारखे आउटसाइडर्स आले तेव्हा नव्हतं. त्याची गॅंग आणि माफियाचे पीआर यांच्यावर रेड झाली पाहिजे आणि त्यांना बाहेरील लोकांना त्रास देण्यासाठी जबाबदार ठरवले पाहिजे. कंगनाचे हे सगळे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.’ 

प्रियांकाला कशी मिळाली हॉलिवूडमध्ये संधी

‘देसी हिट्स’ च्या अंजली आचार्यनं प्रियांकाला एका म्युजिक व्हिडीओमध्ये पाहिले आणि फोन केला. त्यावेळी प्रियांका सात खून माफ या चित्रपटासाठी काम करत होती. तेव्हा अंजलीनं तिला विचारलं की तिला हॉलिवूडमध्ये म्युझिक करियर करायचं आहे का? त्यावर समोरून येणार संधी न सोडता प्रियांकानं लगेच होकार दिला होता[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *