Headlines

Shaitan Twitter Review: ‘शैतान’ जेव्हा घरात येतो! लोकांना नेमका कसा वाटला चित्रपट?

[ad_1]

Shaitan Twitter Review : ‘ज्या गोष्टीची सगळ्यांना प्रतिक्षा होती ते अखेर झालंय ते म्हणजे अभिनेता अजय देवगण आणि आर माधवनचा शैतान हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची प्रतिक्षा करत होते. आज आठ मार्च रोजी महाशिवरात्रीच्या खास दिवशी चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित झाला. आता अजय देवगण एका हॉरर जॉनरातील चित्रपट प्रदर्शित झाला आहे. 

आता अनेकांना वाटत असेल की दृश्यम आणि यात काय फरक आहे. आम्हाला हा त्याच जॉनराच्या जवळपास असल्याचं वाटतं. तर तो एक क्राइम थ्रिलर चित्रपट होता. ज्यात अजय देवगण सर्वसामान्य माणसाशी लढताना दिसतोय. तर शैतानमध्ये अजय देवगणचं कुटुंब हे एका तांत्रिकाशी म्हणजेच काळ्या जादूशी लढताना दिसत आहे. या चित्रपटाचा टिझर आल्यापासूनच सगळ्यांमध्ये याची चर्चा रंगली होती. अनेकांनी या चित्रपटासाठी प्री-बूकिंग देखील केली होती. चला तर जाणून घेऊया प्रेक्षक या चित्रपटाविषयी काय म्हणत आहेत. ट्विटर म्हणजेच आताच्या X अकाऊंटवर नेटकऱ्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. 

एक नेटकरी पोस्ट शेअर करत म्हणाला की ‘अप्रतिम चित्रपट आहे. जान्हवी हे पात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. इन्टर्व्हलपर्यंत जे काही होतं त्यानं नक्कीच तुम्हाला आश्चर्य होईल. आर माधवननं केलेल्या अभिनयानं तुम्ही नक्कीच घाबराल आणि तुम्हाला आश्चर्य होईल. चित्रपटाची पटकथा आणि दिग्दर्शन अप्रतिम आहे. चित्रपटाला 3.5 स्टार.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘चित्रपटात एकतरी चूक निघावी यासाठी मी फार प्रयत्न करत आहे, पण मला एकही चूक सापडली नाही. शैतानसमोर दृश्यम 2 हा काहीच नाही. पण भारतात या चित्रपटाला 200 कोटी पार करणं कठीण होऊ शकतं. पण चित्रपट हा नक्कीच सूपर हिट आहे.’ चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाला 4 स्टार दिले आहेत. अनेक नेटकऱ्यांनी आर माधवनच्या अभिनयाची स्तुती केली आहे. ‘आर माधवन हा पुरुष नाही महापुरुष आहे. तो सुपरमॅन आहे. त्यानं काय अप्रतिम अभिनय साकारला आहे. त्याचे डायलॉग्स ऐकल्यावर खरंच भीती वाटते. चित्रपटातील क्लायमॅक्स पाहताना नक्कीच अंगावर शहारे येतील. हा चित्रपट नक्कीच वाचा.’ असं अनेक नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.  

हेही वाचा : बहिणीच्या निधनानंतर काही तासातच अभिनेत्री डॉली सोहीचं निधन

चित्रपटाच्या कास्टिंगविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री ज्योतिका अजय देवगणच्या पत्नीच्या भूमिकेत दिसत आहे. तर जानकी बोदीवालानं अजय आणि ज्योतिकाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. तर त्यांच्या मुलाची भूमिका अंगद माहलनं साकारली आहे. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *