Headlines

Shaitaan Collection Day 2: सुरु झाला ‘शैतान’चा बॉक्स ऑफिसवर खेळ! केली इतक्या कोटींची कमाई

[ad_1]

Shaitaan Collection Day 2: बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ‘शैतान’ हा चित्रपट 8 मार्च रोजी प्रदर्शित झाला. गेल्या अनेक काळापासून हा चित्रपट चर्चेत होता. अजय हा त्याच्या प्रत्येक चित्रपटातून काही तरी वेगळं देण्याचा प्रयत्न करतो. त्याशिवाय कमी बजेटमध्ये चित्रपट करण्यावर लक्ष केंद्रित करतो. आता शैतान या चित्रपटातून अजय देवगण हा काळा जादूटोना विरोधात जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. 

दोन दिवसात या चित्रपटानं त्यांच्या बजेटची अर्ध कमाई केली. असं म्हटलं जातं की पुढच्या दोन दिवसात हा चित्रपट चांगली कमाई केली. आतापर्यंत ज्यांनी हा चित्रपट पाहिला आहे त्यांनी सगळ्यांनी याची स्तुती केली आहे. चित्रपट समिषकांकडून देखील या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

‘सैकनिल्क’च्या रिपोर्ट्नुसार, ‘शैतान’ च्या कमाईविषयी बोलायचे झाले तर अजय आणि आर माधवनच्या चित्रपटानं प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी 18.25 कोटींची कमाई केली. दरम्यान, असं म्हटलं जातंय की या चित्रपटानं दोन दिवसात एकूण 33 कोटींची कमाई केली. तर अजयच्या या चित्रपटाचा बजेट हा 60-65 कोटींचा आहे.तर ‘शैतान’ नं शुक्रवारी पहिल्या दिवशी 14.50 कोटींची कमाई केली. 

‘शैतान’ला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटात अजयचा एक परफेक्ट फॅमिली मॅनची भूमिका पाहायला मिळाली असून ती प्रेक्षकांना आवडली आहे. त्याशिवाय आर माधवनची ‘शैतान’ला पसंती मिळाली. त्याच्या भूमिकेला पाहून अनेक लोक घाबरू लागले. दरम्यान, आता चित्रपटाच्या निर्मात्यांना आशा आहे की हा चित्रपट रविवारी जास्त कमाई करणार. 

‘शैतान’विषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात अजय देवगणचं कुटुंब दाखवलं असून त्याच्या पत्नीची भूमिका ही अभिनेत्री ज्योतिकानं साकारली आहे. तर त्याच्या मुलीची भूमिका ही जानकी बोदीवालानं साकारली आहे. तर अजयच्या मुलाची भूमिका ही अंगद माहलनं साकारली आहे. तर हा चित्रपट गुजराती चित्रपट ‘वश’ चा हिंदी रिमेक आहे. याचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले होते. या चित्रपटात जानकीनं भूमिका साकारली होती. तर तिलाच पुढे हिंदी चित्रपटात घेतलं. 

हेही वाचा : नितेश तिवारीच्या ‘रामायण’ विजय सेतुपति नाही साकारणार विभीषण; ‘स्कूप’ फेम अभिनेत्यानं मारली बाजी!

अजय देवगणनं ‘मैदान’ चित्रपटात दिसणार आहे. यात तो फुटबॉल कोचच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *