Headlines

कधी रंगामुळे मीम्सचा शिकार झालेली ‘ही’ व्यक्ती आहे शाहरुखची खास!

[ad_1]

Jawan Atlee : सध्या ‘जवान’ चित्रपटाच प्रमोशन जोरदार चालू आहे. शाहरुख खान नावाचा वादळानं संपूर्ण सोशल मीडियावर गारुड घातलय. या सर्वांमध्ये शाहरुख सोबत एक नवीन चेहरा तुम्हाला नक्कीच दिसला असेल… हा चेहरा तुम्हाला काहीसा ओळखीचा वाटलं का? जर तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर तुम्ही या व्यक्तीला नक्कीच ओळखलं असेल. पण जर विसरला असाल तर थोडी आठवण करून देऊ.  ही व्यक्ती म्हणजे शाहरुखचा जवान चित्रपटाचा दिग्दर्शक अॅटली कुमार आहे. अॅटली कुमार हा साऊथचा दिग्गज दिग्दर्शनकांपैकी एक मानला जातो. मात्र, अॅटली कुमार काही वर्षांपूर्वी एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत होता. त्याच कारण त्याचे चित्रपट नव्हते… तर त्याचं खासगी आयुष्य होत. अॅटलीचे अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तुमच्या लक्षात आले का ते मीम्स… नाही? तर चला पाहूया कोणतं मीम्स आणि काय होतं कारण…

एका तरुण जोडप्याचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या फोटोला शेअर करत अनेकांनी ‘प्रेम आंधळं असतं’ किंवा ‘गव्हर्नमेंट जॉब असलेला मुलगा’ अशा कमेंट केल्या होत्या. या फोटोमधील तरुणाचा ज्यात तरुण कृष्णवर्णीय असल्याने त्याचा रंगावरून नेटकऱ्यानी जोरदार खिल्ली उडवली. थोडक्यात नेटकऱ्यांनी या कमेंट करत अॅटली आणि त्याच्या पत्नीमध्ये असलेल्या रंगाच्या फरकाची खिल्ली उडवली होती. अॅटली आणि त्याची पत्नी कृष्णा प्रिया हे त्यावेळी चांगलेच चर्चेत आले होते. आता मात्र, नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल की आपण कोणाविषयी बोलत आहोत. ज्यावेळी हा फोटो व्हायरल झाला होता. त्यावेळी अॅटली विषयी खूप कमी लोकांना माहित होते. आज त्याला संपूर्ण जग ओळखतं असं म्हणायला हरक नाही. 

अॅटली हा कॉलीवूड चित्रपटसृष्टीतील आघाडीचा दिगदर्शक मानलं जातो. रजनीकांत यांचा ‘रोबोट’ आणि ‘नानबाण’ या चित्रपटात अॅटलीनं एस शंकर यांच्या सोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. तर त्यानं ‘राजा रानी’ या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केलं. पुढे त्यानं दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला सोबत घेऊन ‘थेरी’, ‘Mersal and Bigil’ या एकामागोमाग एक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शन केलं. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बीगील’नं तर चक्क 300 कोटींचं कलेक्शन केलं होतं. 

अॅटलीच्या पत्नीविषयी बोलायचे झाले तर कृष्णा प्रिया ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री असून तिने अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय ती साऊथचा सुपरहिट चित्रपट ‘सिंघम’मध्ये दिव्या महालिंगमच्या भूमिकेत दिसली आहे. एटली आणि कृष्णा प्रिया यांनी जवळपास 8 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 2014 मध्ये लग्न केले. त्यांच्या या लग्नात दक्षिण चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मात्र, अनेकदा अॅटलीचा सावळा रंग आणि या जोडप्याचा रंगाचा फरकावरून सोशल मेंडियावर त्यांचावर मीम्स बनवले जातात. 

हेही वाचा : ‘भावनांशी खेळू नको’, भारत की इंडिया? सोशल मीडियावर प्रश्न विचारणारा रितेश देशमुख ट्रोल

2019 मध्ये देखील एका IPL  मॅच दरम्यान पवेलियनमध्ये शाहरुखच्या बाजूला अॅटलीला बसलेले पाहून, शाहरुखच्या बाजूला हा का बसला आहे? असे अनेक प्रश्न सोशल मीडिया वर विचारण्यात आले. मात्र ही जागा त्यानं आपल्या दिसण्यावरून नाही तर आपल्या कर्तृत्वावर संपादन केली असं म्हणायला हरकत नाही. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *