Headlines

शाहरुखचा Jawan पाहताना थिएटरमध्ये गर्लफ्रेंडसोबत केलं असं कृत्य… व्हिडीओ झाला व्हायरल…

[ad_1]

Jawan : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा जवान हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला पाहण्यासाठी शाहरुखचे चाहते आतुर होते. त्यात आता शाहरुखच्या या चित्रपटाला पाहण्यासाठी गेलेल्या अनेक प्रेक्षकांनी थिएटरमधील व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यातील एक वेगळाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शाहरुखचा नाही तर त्याच्या चाहत्याचा आहे. शाहरुखचा चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या चाहत्यानं असं काही केलं आता त्याचीच चर्चा सगळीकडे सुरु आहे. 

शाहरुखच्या चाहत्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओत एक चाहता चलेया या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. शाहरुखनं केलेल्या सगळ्या स्टेप्स तो जशाच्या तशा करताना दिसत आहे. अशात त्यानं त्यात फक्त एक ट्विस्ट केला आणि तो म्हणजे त्यानं त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत असताना तुम्ही पाहू शकता की थिएटरमध्ये उपस्थित असलेले प्रेक्षक त्यांचा व्हिडीओ काढताना दिसत आहेत. तर अनेक प्रेक्षकांनी त्यांना पाहण्यासाठी फ्लॅश लाईट सुरु केल्याचे पाहायला मिळते. त्यासोबत ते त्या कपलसाठी चिअर देखील करत आहेत. 

आज चित्रपट प्रदर्शित झाला असला तरी त्याची आगाऊ बूकिंग ही 1 सप्टेंबर रोजी सुरु झाली होती. तर आज हा चित्रपट किती कमाई करेल याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत नयनतार, विजय सेतुपति, सान्या मल्होत्रा, प्रियामनी, गिरिजा ओक, संजीता भटाचार्य, रिद्दी डोग्रा आणि सुनील ग्रोव्हर दिसणार आहेत. तर बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदुकोण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक एटलीनं केले आहे. तर हा चित्रपट तमिळ, तेलगू, हिंदी या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ही शाहरुख खानची पत्नी गौरी खाननं केली आहे. 

हेही वाचा : प्राजक्ता माळी संपूर्ण शाळेची होती पारो… काय आहे प्रकरण जाणून घ्या…

दरम्यान, इतकं असताना शाहरुखचा हा चित्रपट लीक झाल्याचे देखील म्हटले जात आहे. चित्रपट लीक झाल्यानंतर त्याचा कमाईवर परिणाम होणार की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यानं आता शाहरुख खानला खूप मोठा फटका बसू शकतो.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *