Headlines

‘ही पहिली आणि अखेरची वेळ…’, बुर्ज खलिफावरून शाहरुख खानची मोठी घोषणा

[ad_1]

Shah Rukh Khan : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाचा ट्रेलर काल प्रदर्शित झाला. चेन्नईत एका कार्यक्रमात ऑडियो लॉन्च झाल्यानंतर शाहरुख त्याच्या संपूर्ण टीमसोबत दुबईला निघाले आणि तिथे जाऊन त्यांनी बुर्ज खलीफावर त्यांनी ‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला. इतकं झाल्यानंतर शाहरुखनं खूप मोठी घोषणा केली आहे. त्याच्या या घोषणेनं सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. 

शाहरुखनं ही घोषणा करण्याआधी ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमा दरम्यान, त्याच्या चित्रपटातील ‘जिंदा बंदा’ या गाण्यावर डान्स केला. त्यानंतर शाहरुखनं चित्रपटातील ‘चालेया गाने’ चं अरबी व्हर्जन लॉन्च केलं. याशिवाय शाहरुखनं चित्रपटात असलेल्या पाच भूमिकांविषयी सांगितलं आणि हे अखेरचं असेल की कोणत्या चित्रपटात तो बाल्ड लूकमध्ये दिसेल असे म्हटले. याविषयी बोलताना शाहरुख म्हणाला, ‘मी बाल्ड झालो आहे आणि ही एक अशी गोष्ट आहे जी मी माझ्या आयुष्यात आधी कधी केली नाही. ही पहिली आणि अखेरची वेळ आहे जेव्हा मी बाल्ड लूकमध्ये दिसेल. बघा तुमच्यासाठी मी बाल्डपण झालो. मी तुमच्यासाठी इतकं केलं तर त्याच्यासाठी तरी थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहा. मला पुन्हा बाल्ड पाहण्याची संधी तुम्हाला पुन्हा  मिळेल किंवा नाही, काय माहित, म्हणून थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहा.’

शाहरुख आणि त्यातल्या त्यात त्याच्या जवान या चित्रपटाची क्रेझ पाहता. चित्रपटाची ओपनिंग खूप चांगली असेल असं म्हटलं जातं. त्यातही शाहरुखच्या पठाणनंतर जवान ब्लॉकबस्टर हीट असेल. तो पठाणचे देखील रेकॉर्ड मोडतं नवे रेकॉर्ड बनवले असे म्हटले जाते. तर पहिल्याच दिवशी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 85 कोटींची कमाई करण्याची अपेक्षा आहे. 

हेही वाचा : शाहरुखसोबतच्या शत्रुत्वाचा विजय सेतुपतीनं काढला ‘असा’ वचपा

दरम्यान, चित्रपटात शाहरुख खानसोबत नयनतार, विजय सेतुपति, सान्या मल्होत्रा, प्रियामनी, गिरिजा ओक, संजीता भटाचार्य, रिद्दी डोग्रा आणि सुनील ग्रोव्हर दिसणार आहेत. तर बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदुकोण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक एटलीनं केले आहे. तर हा चित्रपट तमिळ, तेलगू, हिंदी या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ही शाहरुख खानची पत्नी गौरी खाननं केली आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *